भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी हा सामना सुरू होईल. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. पण त्याआधी भारतीय खेळाडू आपल्या-आपल्या घरी गेले आहेत. राजकोट कसोटीसाठी सर्वजण लवकरच पुन्हा एकत्र येतील. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन पुढच्या सामन्यासाठी उत्सुक आहे. त्याचसोबत चेतेश्वर पुजारा सर्वांना त्याच्या घरी जेवणासाठी बोलवेल अशी अपेक्षा देखील अश्विनला आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सध्या सुरू असलेली कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पहिला सामना पाहुण्या इंग्लंडने, तर दुसरा सामना भारताने जिंकला. मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी रविचंद्रन अश्विन याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याचा उल्लेख करत खास अपेक्षा व्यक्त केली. पुजारा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. पण संघातील खेळाडूंसोबत त्याचे संबंध जवळचे आहेत, यात कुठलीच शंका नाही. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या कसोटी सामन्यासासाठी भारतीय खेळाडू राजकोटमध्ये केल्यानंतर पुजारा सर्वांना घरी बोलवू शकतो, असे अश्विनला वाटते.
राजकोट कसोटीपूर्वी अश्विनने आपल्या युट्यूब चॅनलवल व्हिडिओ शेअर केला की, “भारतीय खेळाडू सध्या घरी गेले आहे. राजकोटमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी सर्वजण एकत्र जमतील. राजकोट चेतेश्वर पुजाराचे घर आहे. एक भारतीय दिग्गज ज्याने नुकताच 100 कसोटी सामन्यांटा टप्पा पार केला. आम्ही त्याच्या जागेवर खेळत असून. रविंद्र जडेजाही सौराष्ट्रचा आहे. राजकोट स्टेडियमवर त्याचे होम ग्राऊंट आहे. पण तो जामनगरमध्ये राहतो. आता थांबा आणि वाट पाहा की, चेतेश्वर पुजारा सर्व संघाला गरी जेवणासाठी आमंत्रित करेल.”
दरम्यान, 2016 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला गेला होता. त्यावेळी पुजाराने संपूर्ण भारतीय संघाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. यावेळी पुजारा जरी भारतीय संघाचा भाग नाहीये. पण भारतीय संघाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित नक्कीच करू शकतो. (Cheteshwar Pujara will invite the Indian team for dinner at his home during the Rajkot Test)
महत्वाच्या बातम्या –
Gautam Gambhir : गौतम गंभीरवर कोसळला दुःखाचा डोंगर, कुटुंबातील सदस्याचे झाले निधन…
IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का! संघातील मॅचविनर गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर