---Advertisement---

“त्यांना विराट पाहून घेईल”, शाहीन-रौफच्या ‘त्या’ प्रश्नावर आगरकरांचे मिश्किल उत्तर

On: सोमवार, ऑगस्ट 21, 2023 8:37 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांनी सोमवरी (21 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर आगामी आशिया चषकासाठी संघ घोषित केला. रोहित व आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचवेळी या दोघांचा मिश्किल स्वभाव देखील पाहायला मिळाला.

आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर रोहित व आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संघ निवड व भारतीय संघासमोरील आव्हाने अशा अनेक विषयांवर त्यांनी उत्तरे दिली. त्याचवेळी या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने आगरकर यांना आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची आठवण करून दिली.

आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदी व हारिस रौफ या वेगवान गोलंदाजांविरुद्ध काही योजना बनवल्या आहेत का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना हसून आगरकर म्हणाले,

“त्यांना विराटच पाहून घेईल”

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात विराट कोहली नेहमीच शानदार कामगिरी करत आला आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने 34 धावांवर चार गडी गमावलेले असताना, विराटने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत भारताला 160 धावांचे लक्ष पार करून दिले होते. यामध्ये त्याने शाहीन व रौफ यांचा समाचार घेतला होता. 2021 टी20 विश्वचषकात शाहीनने रोहित शर्मा, केएल राहुल व विराट यांना बाद करत पाकिस्तानला विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

(Chief Selector Ajit Agarkar Funny Reply On Shaheen Afridi And Haris Rauf Question)

महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
शिखर धवनची भविष्यवाणी! विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू करणार धमाका, यादीत दोन भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---