बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या दिग्गजांनी विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात 2 सलामीवीर, 2 यष्टीरक्षक फलंदाज आणि तब्बल 4 अष्टपैलू खेळाडूंना सामील केले आहे. मात्र, यादरम्यान दोन अष्टपैलूंविषयी आगरकरने मोठे विधान केले.
काय म्हणाला अजित आगरकर?
खरं तर, वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात एकूण 4 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. त्यात हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे. अशात निवड समितीप्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्याविषयी मोठी विधान केले आहे.
अजित आगरकर याने अक्षर आणि जडेजाविषयी म्हटले, “जडेजा आणि अक्षर यांच्या गोलंदाजी करण्याच्या शैलीतील समानतेबद्दल आम्ही चर्चा केली आहे. परंतु या दोघांच्याही फलंदाजीत खूप खोली आहे.”
याव्यतिरिक्त आगरकरने इशान किशन आणि केएल राहुल यांच्या निवडीविषयीही भाष्य केले. तो म्हणाला, “ईशान किशन आणि केएल राहुल या दोघांना निवडणे चांगली डोकेदुखी आहे. राहुल जेव्हा फिट होईल, तेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक चर्चा करतील.”
तसेच, पुढे बोलताना आगरकर असेही म्हणाला, “केएल राहुलने पाचव्या क्रमांकावर शानदार धावा केल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्या दोघांशी चर्चा करू.”
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल (Chief Selector ajit agarkar on ravindra jadeja and axar patel)
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासह सुपर-4 सामने होणार शिफ्ट? मोठी बातमी आली समोर
IND vs NEP : भारताने 10 विकेट्सने जिंकला सामना, पण सर्वत्र रंगलीये किशनच्या झेलाची चर्चा
इतिहास घडला! भारताने 10 विकेट्सने विजय मिळवताच रोहित-शुबमन जोडीच्या नावावर खास विक्रमाची नोंद, वाचा