---Advertisement---

शिखरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त! निवडसमिती अध्यक्षांनी दिले स्पष्ट संकेत

SHIKHAR WI
---Advertisement---

मागच्या काही दिवसांपासून आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवडीविषयी अनेक चर्चा सुरू होत्या. सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषकासाठी भारताचा संघ घोषित केला गेला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत दोघांनी देखील सर्व प्रश्नांची अत्यंत समर्पक उत्तरे दिली. भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्याबाबत प्रश्न विचारला असता आगरकर यांनी उत्तर दिले.

मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या शिखर याला आशिया चषकासाठी संघात संधी मिळेल अशी अपेक्षा अनेक चाहत्यांना होती. त्याची आयसीसी स्पर्धा व आशिया चषकातील कामगिरी पाहता अनेकांना ही आशा लागलेली. मात्र, त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. शिखर धवनला का निवडले गेले नाही? असा प्रश्न आल्यानंतर आगरकर म्हणाले,

“शिखर एक दिग्गज आणि असामान्य क्रिकेटपटू आहे. त्याने भारतीय क्रिकेटची मोठी सेवा केली. मात्र, सध्या सलामीवीर म्हणून आमच्याकडे रोहित, शुबमन गिल व ईशान किशन हे पर्याय आहेत. हे तिघेही सध्या उत्कृष्ट कामगिरी करतायेत. संघात केवळ 17 सदस्यांना निवडायचे होते.”

शिखर हा सध्या 38 वर्षांचा आहे. त्यामुळे तो आता भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा अगदीच धुसर झाली आहे. शिखर आशिया चषकात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून, त्याने खेळलेल्या मागील दोनही वनडे विश्वचषकात शक्य झळकावण्याचा पराक्रम केला आहे. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषकात रोहित शर्मा व शुबमन गिल हे भारतातर्फे सलामीला येण्याची शक्यता आहे.

(Chief Selector Ajit Agarkar Talk About Shikhar Dhawan After Asia Cup Sqaud Announcement)

महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---