---Advertisement---

चिंचपोकळीत शतक महोत्सवी चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 4:59 PM
---Advertisement---

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त लालबाग येथील श्री सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणात गुरुवार दि.२ जानेवारी २०२० ते रविवार दि.१२ जानेवारी २०२० या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा महोत्सवात दि.२ जाने. ते दि. ६ जानेवारी २०२० या कालावधीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने स्थानिक पुरुष प्रथम श्रेणी राज्यस्तरीय (निमंत्रित संघ) कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सदर राज्यस्तरीय स्पर्धा २ मातीच्या क्रीडांगणावर खेळाव्यात येणार आहे. स्पर्धेत २१ पुरुष संघ सहभागी होणार असून त्यांची ७ गटात विभागणी करण्यात येईल. साखळी पध्दत व नंतर बाद पद्धतीने सामने खेळवन्यात येतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, ठाणे व पालघर जिल्ह्यातील नामवंत कबड्डी संघ सदर स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मुंबई शहर मधील अंकुर स्पोर्ट्स, जय भारत, विजय क्लब, गोल्फदेवी, बंड्या मारुती, विजय बजरंग व्या., शिवशक्ती, अमर क्रीडा, विजय नवनाथ व युवा स्पोर्ट्स हे संघ सहभागी होणार आहेत. तर मुंबई उपनगर मधील सत्यम, स्वस्तिक, रेल्वे बॉईज व केदारनाथ क्रीडा मंडळ हे नामवंत संघ सहभाग घेणार आहेत. हनुमान सेवा मंडळ व स्व. आकाश क्रीडा मंडळ हे ठाणे जिल्ह्यातील दोन संघ तर सोनार सिद्धधाटव व जयबजरंग क्रीडा मंडळ हे रायगड जिल्ह्यातील संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. रहाटणी क्रीडा मंडळ पुणे व आई अष्टभुजा कबड्डी संघ पालघर हे संघ सदर स्पर्धेत खेळणार आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1212317237110964224

https://twitter.com/Maha_Sports/status/1212324669845454849

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---