---Advertisement---

एकेवेळी टीम इंडियाला रडवणारा ‘हा’ महान खेळाडू नंतर करत होता बस धुवण्याचे काम

---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेटमधील सर रिचर्ड हॅडली, मार्टिन क्रो, स्टीफन फ्लेमिंग, नथन अॅस्टल, ब्रँडन मॅक्क्युलम अशा एकाहून एक सरस खेळाडूंनी आपली कारकीर्द गाजवली. भन्नाट फलंदाज आणि चिवटपणा हा त्यांचा सर्वाधिक चांगला गुण. यासोबतच न्यूझीलंड क्रिकेटमध्ये असा एक अष्टपैलू खेळाडू होता, ज्याच्याचील गुणवत्ता सामन्यागणिक ओसंडून वाहत होती. 

फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये बहारदार खेळ करत संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. एकेकाळी आपल्या संघाचे ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आज गरिबी आणि संकटाना लढा देत जीवन जगत आहेत. ख्रिस क्रेन्स असे त्यांचे नाव आहे. सध्या तो हॉस्पिटलमध्ये असून मृत्यूशी झुंज देत आहे. काहीदिवसांपूर्वीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच त्यानंतर त्याच्या पायांना पॅरेलिसेस झाला आहे. 

न्यूझीलंडला अनेक सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या ख्रिस क्रेन्सला भारतीय संघ कधीच विसरू शकत नाही. 2000 साली केनिया येथे झालेल्या आयसीसी नॉक आउट कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने अजोड शतकी खेळी करत भारताच्या आवाक्यात आलेला चषक हिसकावून घेतला.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने सौरव गांगुलीचे शतक(117) आणि सचिन तेंडुलकरच्या अर्धशतकी (69) खेळीच्या जोरावर 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या 109 धावात चार गडी बाद झाले. सर्वजण भारतीय संघ ही स्पर्धा जिंकेल असेच भाकीत करत होता. त्यावेळी मैदानावर अष्टपैलू खेळाडू ख्रिस क्रेन्स उतरला आणि एकहाती किल्ला लढवून संघाचा डाव सावरला. हॅरिसला हाताशी धरत त्याने भारतीय गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावत अवघ्या 113 चेंडूत नाबाद 102 धावांची सुरेख खेळी करत न्यूझीलंडला चॅम्पियन बनवले.

मॅच फिक्सिंगचे आरोप
निवृत्तीनंतर ख्रिस क्रेन्सवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप लावण्यात आले. पण आपल्यावर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप नाकारून दिले. इंडियन क्रिकेट लीगमध्ये न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू लू व्हिन्सेंट याने हा मॅचफिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता.  फिक्सिंगची ऑफर दिल्याचे आरोप त्याने ख्रिसवर लावले. त्यानंतर माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम याने देखील ख्रिसवर आरोप लावले होते. पण शेवटी हे आरोप सिद्ध झाले नाहीत.

आर्थिक संकटांचा सामना
न्यूझीलंडला चॅम्पियन बनवणारा हा खेळाडू  २०१५-१६ या काळात आर्थिक संकटाचा सामना करत होता. परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी ऑकलँड येथे बस धुण्याचे काम करत होता. यापूर्वी तो ऑकलँड येथील नगरपालिकेची ट्रक चालवण्याचेही काम करत होता. आज ना तो सोशल मीडियावर दिसतो ना न्यूझीलंड क्रिकेटमधील वर्तमानपत्रांच्या हेडलाइनमध्ये दिसतो. एका मोठ्या खेळाडूला असे जीवन जगावे लागेल, असे कधी कुणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते.

वडिलही होते महान क्रिकेटर
क्रेन्सचे वडिल लान्स क्रेन्स हे देखील न्यूझीलंडचे महान क्रिकेटपटू होते. त्यांनी न्यूझीलंडकडून ४३ कसोटी व ४८ वनडे सामने खेळले. यात त्यांनी अनुक्रमे १३० व ८९ विकेट्स घेतल्या. त्याचे काका बॅरी रोबर्ट्स देखील न्यूझीलंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. जगातील यशस्वी बाप लेक क्रिकेटर जोडीतील सर्वात अव्वल जोडी म्हणून क्रेन्स पिता पुत्राकडे पाहिले जाते.

ख्रिस क्रेन्सची कारकिर्द
ख्रिस क्रेन्सने 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये 62 सामन्यात 3320 धावा केल्या तर 215 एकदिवसीय सामन्यात 4950 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे. यात 9 शतक आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने 218 , 201अनुक्रमे बळी घेतले आहेत. कसोटीत 13 वेळा पाच गडी बाद करण्याचा कारनामा केला. तर  एक वेळ दहा गडी बाद करण्याचा विक्रम केला.

क्रेनचे वय सध्या ५१ वर्ष आहे. तसेच तो त्याच्या कुटुंबासह काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाला असल्याचे म्हटले जाते.

महत्त्वाच्या बातम्या – 

पंचांनी हटवली रिषभच्या ग्लोव्हजवरील पट्टी, वाचा काय आहे नियम

अबब! ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन’ला मिळाली ‘इतकी’ किंमत

चार षटके, तीन धावा अन् तब्बल ७ विकेट्स, टी२० क्रिकेटच्या इतिहासात घडला मोठा विश्वविक्रम

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---