भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि कॅरेबियन दिग्गज ख्रिस गेल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर दिसून आले. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रामध्ये दोघेही स्टॅंडवर चाहत्यांना एकत्र दिसले. सामन्यावेळी गिलने भारतीय संघातील खेळाडूंची तारीफ केली. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. तर चला आपण पाहू गिल नेमकं म्हटला तरी काय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना बघण्यासाठी कॅरेबियन दिग्गज ख्रिस गेल स्टेडियमवर उपस्थित होता. यावेळी भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंचे त्याने भरभरून कौतुक केले. आयसीसीशी संवाद साधताना तो म्हणाला की, “द हिटमॅन, रोहित शर्मा माझ्याकडे असलेल्या सिक्स मारण्याच्या क्षमतेच्या सर्वात जवळ आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे, तो खेळाचा एक लीजेंड आहे.” यावेळी पुढे बोलताना त्याने पांड्याचे देखील कौतुक केले. तो म्हणाला की, “हार्दिक पांड्या हा सध्याचा सर्वात स्टायलिश खेळाडू आहे. त्याच्या सूटमध्ये विराट कोहली एकदम सज्जन दिसतो”.
सामन्यावेळीची गिलचे फोटो झाले व्हायरल
जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना बघण्यासाठी चाहत्यांसोबतच, क्रिकेटमधील दिग्गजांनीही आवर्जून हजेरी लावली होती. दरम्यान, ओव्हल स्टेडियमच्या स्टॅंमध्ये ग्रिस गेल (Chris Gayle), शिखर धवन (Shikhar Dhawan), या सोबतच 1983 विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) देखील उपस्थिक होता. तर यांचे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहेत. (Oval Stadium)
ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मोहम्मद सिराजला सलामीवीर उस्मान ख्वाजाची विकेट मिळाली. त्याचवेळी, लंचच्या आधी शार्दुल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला पव्हेलियन मध्ये माघीरी पाठवले. ऑस्ट्रेलिया संघाने एकुण 327 धावांचा डोंगर भारतासमोर उभा केला. यामध्ये सर्वांत मोठा वाटा ट्रॅव्हिस हेड 146 (travis Head) आणि स्टीव्ह स्मिथ 95 (Steve Smith) यांच्या धावांचा आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये 251 धावांची नाबाद भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट