वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने क्रिकेटच्या टी-१० या नव्या प्रकारचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. गेल अबुधाबी टी-१० स्पर्धेच्या आगामी हंगामात अबुधाबी संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याच्या मते जगभरातील मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करण्यासाठी टी-१० हा अतिशय योग्य प्रकार आहे.
जमैका येथील आपल्या घरून तो बोलत होता. गेल म्हणाला, “सध्या मी आराम करत आहे कारण मला त्याची आवश्यकता आहे. परंतु अबुधाबी टी-१० स्पर्धेच्या दृष्टीने मी लवकरच सरावाला सुरुवात करणार आहे. दोन हंगामांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करत असल्याने मी यासाठी अतिशय उत्साहित आहे.”
या स्पर्धेबाबत बोलताना गेल म्हणाला, “या स्पर्धेत अनेक प्रतिभावंत खेळाडू खेळणार आहेत. किरोन पोलार्ड सारखे आंतरराष्ट्रीय खेळाडूही यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे अबुधाबी संघात पुनरागमन करताना मी आनंदी आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीस देखील माझ्या संघात आहे. यापूर्वीही मी त्याच्यासोबत खेळलो आहे. यावेळी देखील त्याच्या सोबत आणि इतर सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.”
टी-१० क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये व्हावा समावेश
टी-१० क्रिकेटच्या भविष्याबद्दल बोलताना गेल म्हणाला, “टी-१० क्रिकेटचा ऑलम्पिकमध्ये समावेश केला जावा अशी माझी इच्च्छा आहे. क्रिकेटच्या दृष्टीने ही मोठी घडामोड असेल. मला तर टी-१० क्रिकेटचे आयोजन अमेरिकेत केले जावे, असेही वाटते. अमेरिकेतील लोकं क्रिकेटबद्दल अनभिज्ञ आहेत. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी टी-१० क्रिकेट उपयुक्त ठरेल. क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळण्यासाठीही हे फायदेशीर ठरेल.”
महत्वाच्या बातम्या:
चीते की चाल, बाज की नजर और जडेजा की थ्रो पे कभी संदेह नहीं करते
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण
विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू