---Advertisement---

“चीते की चाल, बाज की नजर और जडेजा की थ्रो पे कभी संदेह नहीं करते”

On: शुक्रवार, जानेवारी 8, 2021 6:16 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ३३८ धावांवर संपुष्टात आला. रवींद्र जडेजाने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करत ऑस्ट्रेलियाचा शतकवीर स्टीव स्मिथला रन आउट करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला.

जडेजाच्या या शानदार क्षेत्ररक्षणाचे कौतुक आता सर्वत्र होत आहे. ट्विटरवर तर जडेजाचे कौतुक करणाऱ्या पोस्टचा वर्षावच झाला. आता या कौतुक करणाऱ्यांमध्ये भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरची देखील भर पडली आहे. जाफरने आपल्या खास अंदाजात जडेजाची स्तुती केली.

वसीम जाफर सोशल मिडीयावर खास अंदाजात पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने शेअर केलेले भन्नाट मिम्स नेहमीच व्हायरल होत असतात. यावेळीही जडेजाच्या रन आउटची स्तुती करण्यासाठी जाफरने अशीच काहीशी शक्कल लढवली आहे. जाफरने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील एका संवादाचा संदर्भ यासाठी घेतला आहे. जडेजाने केलेल्या रन आउटचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “चीते की चाल, बाज की नजर और जडेजा की थ्रो पे कभी संदेह नहीं करते|”

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवसाखेर सामना दोलायमान अवस्थेत आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात ३३८ धावांवर सर्वबाद झाला असून स्मिथच्या १३१ धावा त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्याच्या प्रत्युतरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने दिवसाखेर २ बाद ९६ धावांची मजल मारली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे ५ तर चेतेश्वर पुजारा ९ धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या खेळात सामन्याचे पारडे कोणच्या बाजूने झुकेल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅमरॉन ग्रीनने एकअंगी झुकत पकडला शुबमन गिलचा शानदार झेल, पाहा व्हिडिओ

व्वा रे व्वा! पठ्ठ्याने बर्थडे दिवशी घेतली रोहित शर्माची विकेट अन् घातली मोठ्या विक्रमाला गवसणी  

“स्मिथचा रन आउट माझ्यासाठी कारकिर्दीतील अतिशय खास क्षण”, रवींद्र जडेजाची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---