देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व भारतीय एकमेकांना भेटून शुभेच्छा देत आहेत. सामान्य नागरिकांसह, बॉलीवूड सेलिब्रिटी, नेतेमंडळी आणि खेळाडूंनी देखील सोशल मीडियाद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) याने देखील ट्वीट करत सोशल मीडियाद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ख्रिस गेलला शुभेच्छा देणारे पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर देत, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने लिहिले की, “मी भारतातील संपूर्ण जनतेला ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रामुळे माझी सकाळ खूप चांगली झाली आहे. माझे भारतातील नागरिकांसोबत आणि भारतासोबत असलेले चांगले संबंध पाहून त्यांनी मला खास संदेश पाठवला. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. सर्वांना युनिव्हर्स बॉसकडून शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम” (Chris Gayle tweet on independence day)
ख्रिस गेल हा गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे खेळत आहे. त्याचे भारतात प्रचंड चाहते आहे. भारतात त्याच्या फलंदाजीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच अनेकदा त्याने सोशल मीडियाद्वारे भारतावर असलेले प्रेम व्यक्त केले आहे. भारतात त्याची लोकप्रियता एका सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये.
I would like to congratulate India on their 73rd Republic Day. I woke up to a personal message from Prime Minister Modi @narendramodi reaffirming my close personal ties with him and to the people of India. Congratulations from the Universe Boss and nuff love 🇮🇳🇯🇲❤️🙏🏿
— Chris Gayle (@henrygayle) January 26, 2022
तसेच ख्रिस गेलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या प्रतिष्ठित लीग स्पर्धेत १४२ सामन्यात ३९.७ च्या सरासरीने ४९६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतक आणि ३१ अर्धशतक झळकावले आहेत. फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना १८ गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर
हे नक्की पाहा: