क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडू असे असतात, जे एकदा खेळपट्टीवर स्थिरावले की, त्यांना बाद करणं खूप कठीण असतं. असाच एक फलंदाज ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ‘व्हिक्टोरिया प्रीमियर क्रिकेटच्या (Victoria premier cricket) द्वितीय श्रेणी क्रिकेट स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत एका फलंदाजाने तुफानी खेळी करत २३७ धावा चोपल्या आहेत.
या स्पर्धेत ख्रिस देवलिस (Chris Thewlis) डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. त्याने तुफानी खेळी करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या ७२ चेंडूंमध्ये २३७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ४४ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहचवले. या तुफानी खेळीच्या जोरावर केंपरवेल संघाला ४४१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात किंग्स्टन हॉथोर्न संघाला ८ बाद बाद अवघ्या २०३ धावा करण्यात यश आले होते.
ख्रिस देवलिसने या डावात २३७ धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो जेव्हा २३६ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची संधी होती. परंतु ही संधी हुकली. क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यानंतर गोलंदाज भलताच चिडला होता. तसेच जोर जोरात ओरडू लागला की, प्रत्येक आठवड्यात असच होत असतं.
You're going to need the sound 🆙 for this one!
Who can relate? 😬 pic.twitter.com/cnnYDZswvH
— PlayCricket AU (@PlayCricketAU) January 22, 2022
Chris Thewlis nailed 2️⃣0️⃣ fours and 2️⃣4️⃣ sixes in his innings of 237 (72) in @vicpremcricket twos yesterday!
Each and every one of them was caught on a @Frogboxlive camera 👀🍿 pic.twitter.com/l4WqCUUHLw
— PlayCricket AU (@PlayCricketAU) January 23, 2022
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे तर दिसून येत नाहीये की, क्षेत्ररक्षकाने कशाप्रकारे झेल सोडला. परंतु गोलंदाजाने दिलेली रिॲक्शन पाहून असे वाटत आहे की, हा खूप सोपा झेल होता. फॉक्स स्पोर्ट्सच्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया प्रीमियर क्रिकेटच्या द्वितीय श्रेणीतील इतिहासातील ही सहावी सर्वोच्च धावसंख्या आहे. ख्रिसच्या आधी, मॉर्गन पर्सन क्लार्कने २०१४-१६ हंगामात नाबाद २५४ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानंतर आली आफ्रिदीची प्रतिक्रिया; म्हणाला,” केएल राहुलला…”
हे नक्की पाहा: