जुलै महिन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स याला पुरुष प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडले गेले. तर दुसरीकडे महिला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनर हिची निवड झाली आहे. वोक्सने ऍशेस 2023मध्ये इंग्लंडसाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते, तर गार्डनरने हा पुरस्कार जिंकल्यानंतर आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनरने रचला इतिहास –
ऑस्ट्रेलियन महिला संघाचा खेळाडू ऍश्ले गार्डनर (Ashleigh Gardner) जून 2023 मध्येही आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरली होती. त्यानंतर जुलै महिन्यात देखील तिने आपल्या संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले आणि सलग दुसऱ्यांदाच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरली. अशा प्रकारे हा पुरस्कार सलग दोन वेळा जिंकणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी ही कामगिरी एकही महिला खेळाडू करू शकली नव्हीत. पण आता गार्डनरने ही कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. गार्डनरने जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळी करत हा पुरस्कार पटकावला आहे.
ख्रिस वोक्स ऍशेस 2023 मध्ये ठरला गेम चेंजर –
इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स (Chris Woakes ) याने ऍशेस 2023 मध्ये जबरदस्त गोलंदाजीचा नजारा सादर केला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधीही मिळाली नव्हती. या दोन्ही सामन्यात यजमान इंग्लंड संघ पराभूत झाला होता. पण त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचे संघात आगमन झाले. परिणामी राहिलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने इंग्लंडने जिंकले, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. (chris woakes and ashleigh gardner has been awarded the icc player of the month)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । विश्वचषकापूर्वी कमिन्स करणार मैदानात पुनरागमन, शेवटच्या ऍशेस कसोटीत झालेली दुखापत
बुमराहच्या कमबॅकची प्रतीक्षा संपली! आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार आणि भारतीय संघ रवाना