---Advertisement---

बेन स्टोक्स नंतर इंग्लंडचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर

On: सोमवार, जून 4, 2018 5:16 PM
---Advertisement---

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स हा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. स्कॉटलंड विरूध्द होणाऱ्या वन-डे सामन्याच्या संघात त्याचा समावेश होता. सरेचा टॉम करण हा संघात त्याची जागा घेणार आहे.

वोक्सने हेडिंग्लेच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या दुसऱ्या सत्रात मैदानतून माघारी गेला होता. येत्या 13 जूनला होणाऱ्या अॉस्ट्रेलिया विरूध्दच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठीही त्याची संघात निवड करण्यात आली होती. मात्र तो दुखापतीग्रस्त असल्याने  तंदूरूस्त आहे की नाही याासाठी त्याची चाचणी होणार आहे.

पाकिस्तान विरूध्द लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यासाठी वोक्सला बोलावले होते मात्र त्याच्या जागी मार्क वूडला संघात घेतले. वूडने या सामन्यात पहिल्या डावात 74 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदची विकेट काढली होती.

टॉम करण हा हेडिंग्लेमध्ये पदार्पण करणाऱ्या सॅम करणचा भाऊ आहे. तो सुध्दा अॉस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाचा भाग आहे.

बेन स्टोक्सनंतर वोक्स हा दुसरा खेळाडू आहे जो मांडीच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. तंदूरूस्त चाचणीत तो झाल्यावर फिट असला तर अॉस्ट्रेलिया मालिकेसाठी संघात येऊ शकतो. मात्र इंग्लंड क्रिकेटने आधीच स्पष्ट केले की, तो अॉस्ट्रेलिया विरूध्दच्या सामन्यास मुकणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment