क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणतात ते काही उगीच नाही. येथे अनेकदा खेळाडूंची खिलाडूवृत्ती पाहायला मिळते. सध्या जारी टी20 ब्लास्ट 2024 मध्ये पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे.
या स्पर्धेत हॅम्पशायर आणि केंट यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजानं फलंदाजाला धावबाद केलं नाही, कारण तो चेंडू लागून दुखापतग्रस्त झाला होता. चेंडू लागल्यानंतर फलंदाज अर्ध्या क्रीजपर्यंत पोहोचला होता, पण तरीही गोलंदाजानं त्याला आऊट केलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ खरोखर तुमचं मन जिंकेल.
सामन्याच्या पहिल्या डावातील शेवटच्या षटकात ही घटना घडली. हॅम्पशायरसाठी ख्रिस वुड डावातील शेवटचं षटक टाकत होता. वुडनं चेंडू टाकला, ज्यावर फलंदाज जॉय इव्हिसननं जोरदार शॉट खेळला. चेंडू त्याच्या बॅटच्या मध्यभागी लागला, मात्र तो थेट नॉन-स्ट्रायकर एंडला उपस्थित असलेल्या मॅथ्यू पार्किन्सनला जाऊन लागला. पार्किन्सनला चेंडू लागला तेव्हा तो जवळपास अर्ध्या क्रीझपर्यंत आला होता.
यादरम्यान, वुडन पटकनं चेंडू उचलला आणि तो त्याला धावबाद करायला गेला. मात्र नॉन स्ट्राइक एंडला असलेला पार्किन्सन चेंडू लागल्यामुळे क्रिझवर पडल्याचं पाहताच वुडनं त्याला धावबाद केलं नाही. ख्रिस वुडची ही वागणूक त्याची खिलाडूवृत्ती दर्शवते. चाहते वुडच्या या स्पिरीटचं कौतुक करत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Impeccable sportsmanship 👏
Matt Parkinson is struck by the ball, and Chris Wood chooses not to run him out 🫡 pic.twitter.com/RijvNEpqWi
— Vitality Blast (@VitalityBlast) June 2, 2024
2 जून रोजी साउथम्प्टनच्या ‘द रोझ बाउल’ येथे खेळल्या या गेलेल्या सामन्यात हॅम्पशायरनं केंट विरुद्ध 3 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केंट संघानं 20 षटकात 9 गडी बाद 165 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हॅम्पशायरनं 19.5 षटकांत 7 गडी राखून विजय मिळवला. हॅम्पशायरसाठी जो वेदरलीनं सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 32 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीनं 49 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा हेड कोच बनण्याच्या चर्चांवर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “हा सन्मान…”