गुजरातच्या सीआयडी शाखेनं चार प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंना समन्स पाठवले आहेत. शुबमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन अशी या चार क्रिकेटपटूंची नावे असून त्यांना 450 कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात अटक होऊ शकते. गुंतवणुकीतील फसवणुकीचा किंगपिन भूपेंद्र सिंग जाला याची तपास यंत्रणांनी चौकशी केली असता ही बाब समोर आली आहे. या चार क्रिकेटपटूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याचं त्यानं उघड केलंय.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या शुबमन गिलनं या योजनेत 1.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याच्याशिवाय अन्य तीन क्रिकेटपटूंनी त्याच्यापेक्षा कमी रक्कम गुंतवली होती. भूपेंद्रसिंग जालाचं खातं सांभाळणाऱ्या रुषिक मेहताला सीआयडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
एका रिपोर्टनुसार, या प्रकरणात मेहता दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाऊ शकते. सीआयडीनं अकाउंटंट्सची एक टीम तयार केली आहे, जी जालाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक अकाउंट बुक्स आणि व्यवहारांची चौकशी करेल. सीआयडीनं अनौपचारिक बुक्स जप्त केले आहेत. या प्रकरणी सोमवारपासून सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
जाला यानं 6 हजार कोटींचा घोटाळा केल्याचं अधिकाऱ्यांनी यापूर्वी उघड केलं होतं. नंतर ही रक्कम 450 कोटींवर आली. अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “जाला अनौपचारिक लेखाजोखा सांभाळत होता, जो सीआयडी युनिटनं ताब्यात घेतला आहे. या बुकमध्ये 52 कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. तपासणीनुसार एकूण रकमेचा अंदाज लावला गेला, जी.450 कोटी रुपये आहे. अद्यापही छापे सुरू राहिल्यानं ही रक्कम आणखी वाढू शकते.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ कधी जाहीर होणार? निश्चित तारीख जाणून घ्या
माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरच्या कोचिंगवर सवाल, एकापाठोपाठ एक सांगितल्या अनेक चुका!
“रोहित शर्माने निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटणार नाही…”, माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्यानं खळबळ!