पुणे । पद्मावती रॉयल्स, पी. पी. रॉयल्स, पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स, ओशोरा या संघांनी सर्कल ग्रुपच्या वतीने आणि गॅलेक्सी रिअॅलिटी प्रायोजित गॅलेक्सी सर्कल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
आता पहिल्या उपांत्य फेरीत पद्मावती रॉयल्स आणि पी. पी. रॉयल्स, तर दुस-या उपांत्य फेरीत पुष्पांजली आणि ओशोरा आमनेसामने येतील.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. यात गटातील लढतीत ओशोरा संघाने सहारा टायटन्स संघावर ४३ धावांनी मात केली. ओशोरा संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद ११८ धावा केल्या.
यानंतर सहारा संघाला ७ बाद ७५ धावांत रोखले. यानंतर पद्मावती रॉयल्स संघाने योगेश इलेक्ट्रो स्टार्स संघावर ४१ धावांनी मात केली. यानंतर पी. पी. रॉयल्स संघाने समृद्धी रायझर्स संघावर सहा गडी राखून मात केली.
समृद्धी रायझर्स संघाने दिलेले ८२ धावांचे लक्ष्य पी. पी. रॉयल्स संघाने ८.५ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. यानंतर पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स संघाने डॉ. अगरवाल संघावर २४ धावांनी मात केली.
संक्षिप्त धावफलक ।
१) ओशोरा – १० षटकांत २ बाद ११८ (रितेश चंडाक नाबाद ३५, प्रमोद दुबे नाबाद ३३, चंदन मुंदडा २८, सुरज झंवर १-९) वि. वि. सहारा टायटन्स – १० षटकांत ७ बाद ७५ (अमित कोठारी नाबाद १७, प्रमोद दुबे ३-९).
२) पद्मावती रॉयल्स – ७ षटकांत २ बाद ९७ (देवांग काब्रा नाबाद ४३, कपिल तपाडिया २४, राहुल गडिया १-७) वि. वि. योगेश इलेक्ट्रोस्टार्स – ७ षटकांत ६ बाद ५६ (किरण शहा २०, कमलेश खातोड १-५, देवांग काब्रा १-५).
३) समृद्धी रायझर्स – १० षटकांत ५ बाद ८१ (निलेश झंवर ३१, दीपक भराडिया २९, विजय राठोड १-१०) पराभूत वि. पी. पी. रॉयल्स – ८.५ षटकांत ४ बाद ८२ (सुनील कारवा नाबाद ३८, अभय व्होरा नाबाद १७, निलेश झंवर २-११).
४) पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स- १० षटकांत २ बाद १०३ (सुनील बहेती नाबाद ३३, कल्पेश भुतडा २७, विनय भुतडा २२, मनोज शहा १-६) वि. वि. डॉ. अगरवाल आयकॉन्स – १० षटकांत ४ बाद ७९ (चेतन तपाडिया २२, योगेश शहा २०, संदीप मुंदडा २-१०).