पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित १४ वर्षांखालील गटाच्या साखळी फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी पुणे आणि रायजिंग पुणे एफसी संघांनी आपापल्या प्रतिसंघांचा पराभव केला.
एसएसपीएमएसच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सिटी एफसी पुणे संघाने ग्रीनबॉक्स चेतक एफसी संघाचा ५-० गोलने पराभव केला. विजयी संघाकडून श्रेयस सहस्त्रबुद्धेने २ (३ व ३१ मिनीट), गणेश पवारने १ (२ मिनीट) मीत पटेल १ (२७ मिनीट) आणि आरमान अहमद १ (४८ मिनीट) यांनी गोल केले.
दुसऱ्या लढतीत रायजिंग पुणे एफसी संघाने दुर्गा एफएचा ६-० गोलने पराभव केला. विजयी संघाकडून आराध्य अगर (१९ मि.), सौनक चौटा (२४ मि.), आर्यन सुर्यवंशी (३३ मि.) यांनी प्रत्येकी एक आणि तैफिल आत्तारने (३६ व ४७ मि.) दोन गोल केले.
तिसऱ्या सामन्यात डेक्कन इलेव्हन संघाने दिक्षा एफ. ए संघाचा ७-० गोलने धुव्वा उडविला. डेक्कन इलेव्हन संघाकडून
ओजस खाडीलकरने १४ व ४१ व्या मि., अमेय देशपांडेने ३८ व ४८ व्या मि., विहान हर्डिकरने ८ व २२ व्या मि.व नुकुल हर्डिकरने ३३ व्यया मिनिटाला गोल केले.
इतर लढतींचे निकाल
र्बासा अकॅडमी : ८ गोल (आदित्य मराठ ४, २२, २५ व्या. मि., रेहान खान २१ व्या मि., युवराज सिंग ३२ व. मि., यथार्थ यथ यर्थाथ जोशी ३४ व्या मि., इशान जाधव ४७ व मि.) वि. वि. चोंदे पाटिल एफ.ए. : शून्य गोल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहचा मार खाणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडचा कौतुक करणारा विक्रम, ठरला इंग्लंडचा दुसराच खेळाडू
या शतकानंतर जडेजा खऱ्या अर्थाने झाला ‘सर’! कपिल, धोनी यांच्या यादीत समावेश