पुणे: श्रीलंका येथे पीर पडलेल्या चौदाव्या आशिया स्कुल बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत 9 वर्षाखालील मुलांच्या गटात अक्षय बोरगावकरने ब्लिट्झ फॉरमॅट प्रकारात सुवर्ण पदक पटकावले तर क्लासीक फॉरमॅट प्रकारात स्पर्धेत दुस-या क्रमांकासह रौप्य पदक पटकावले.
हे दोन्ही परस्पर विरोधी फॉरमॅट असल्याने यामध्ये पदक मिळवणे अतिशय कठीण असते मात्र अक्षयने ही कामगिरी करून भारताची मान उंचावली आहे.
अक्षय विखे पाटील मेमोरिअल स्कुल येथे चैथ्या इयत्तेत शिकत असून कुंटे चेस अकादमी येथे प्रशिक्षण घेतो. स्पर्धेत 10 देशांमधील 48 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ब्लिट्झ फॉरमॅट प्रकारात अक्षयने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याने सर्व फे-या जिंकल्या.
यावेळी त्याला केवळ उझबेकीस्तानच्या खेळाडूचा धोका वाटत होता. उझबेकीस्तानचा खेळाडूला अक्षय पेक्षा 300 एलो जास्त असल्याने त्याला हरवणे अवघड होते. अक्षयला या गोष्टीची पुर्ण कल्पना असल्याने अक्षयने डी फोर खेळून त्याच्यावर ट्रोम्पोव्स्क्यी अटॅक केला.
यामुळे अक्षयचा त्याच्याबरोबरचा सामना बरोबरीत सुटला. बाकी सर्व फे-या अक्षयने जिंकल्यामुळे अक्षयने निर्विवाद विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले.
क्लासीक फॉरमॅट प्रकारात खेळत असताना त्याला शेवटच्या फेरीत विजय मिळवायचा होता. अक्षय एक प्यादे गमावुन खेळत होता. ह्या पोझिशन मधुन विजय मिळविणे अवघड होते. मात्र आपले कौशल्य पणाला लावुन त्याने हा विजय मिळवला. ही शेवटची फेरी साडेचार तास चालली.
महत्त्वाच्या बातम्या:
वनडे मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…
अर्जुन तेंडुलकरने मिळवला पहिला बळी, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरवात