ऑस्ट्रेलिया देशात पुरुषांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचगिरी करणारी पहिली महिला पंच बनायचा मान हा क्लेर पोलोसॅकला मिळाला आहे. ती जेव्हा रविवारी न्यू साऊथ वेल्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया ११ संघादरम्यान जेष्ठ पंच पॉल विल्सन यांच्याबरोबर मैदानावर उतरले तेव्हा हा विक्रम होणार आहे.
विशेष म्हणजे ती कधीही क्रिकेट खेळली नाही शिवाय ती अनेक वेळा अंपायरसाठीची परीक्षाही नापास झाली होती. परंतु या सर्वांवर मात करत ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेटमध्ये देशांतर्गत सामन्यांत पंचगिरी करण्याचा मान तिला मिळाला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कही खेळणार असण्याची शक्यता आहे.२९ वर्षीय क्लेर पोलोसॅकने यापूर्वी इंग्लंड देशात झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत ४ सामन्यात सामानाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
“क्रिकेट पंच होणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. जरी मी एकही सामना खेळले नाही किंवा मला क्रिकेटचा अनुभव नाही तरी ही एक मोठी गोष्ट आहे, “ असे क्लेर पोलोसॅक म्हणते.