---Advertisement---

बांगलादेशी फिरकीपटू निर्दोष! आता पुन्हा चेंडू फिरवण्यासाठी सज्ज

Shakib Al Hasan
---Advertisement---

बांगलादेशचा माजी कर्णधार शाकीब अल हसन आता वनडे आणि जगभरातील सर्व लीगमध्ये क्रिकेट खेळू शकतो. 37 वर्षांचा असलेल्या शाकीबच्या गोलंदाजीला आता निर्दोष घोषित करण्यात आले आहे आणि आता तो मैदानावर पुन्हा उतरू शकतो. त्याने कसोटी क्रिकेट आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे.

मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये इंग्लिश काउंटी साठी खेळताना शाकीबवर ॲक्शन घेण्यात आली होती आणि त्याला अमान्य ठरवण्यात आले होते. यानंतर शाकिबने जानेवारीमध्ये चेन्नई येथे चाचण्या केल्या, त्यामध्ये त्याला अमान्य ठरवण्यात आले. या कारणाने त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर राहावे लागले.

शाकिब क्रीकबजशी बोलताना म्हणाला, गोलंदाजी चाचणीमध्ये निर्दोष असणे ही गोष्ट खरी आहे आणि आता मी गोलंदाजी करू शकतो .
त्याने शेवटच्या वेळेस भारताविरुद्ध ऑक्टोबर 2024 मध्ये कानपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळला होता. तसेच आता बांगलादेशला श्रीलंका विरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये तो भाग घेऊ शकतो. तो आयपीएल पीएसएलचा भाग नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला कोणी खरेदीदार मिळाला नाही.

अष्टपैलू शाकिब हसनने बांगलादेश साठी आत्तापर्यंत 247 वनडे खेळलेले आहेत. यादरम्यान त्याने 37.77 च्या ऍव्हरेजने 4609 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 317 विकेट्स सुद्धा घेतलेल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---