---Advertisement---

पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी उपांत्यपूर्व फेरीत

On: बुधवार, जून 8, 2022 7:16 PM
fOOTBALL
---Advertisement---

पुणे। पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी आणि पीसीएच लायन्स यांनी बुधवारी पीडीएफए फुटबॉल लीगच्या तृतीय श्रेणी मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स प महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पुणेरी वॉरियर्सने नियोजित वळे मॅथ्यू एफ ए तील 1/1 अशा बरोबरी नंतर टायब्रेकमध्ये चा 6/5 असा पराभव केला. रोहित जाधव मॅथ्यू एफ ए संघाला 18व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली होती. मनीष देशमुखने 38व्या मिनिटाला पुणे वॉरियर्सला बरोबरी मिळवून दिली.

टायब्रेकरमध्ये अनिकेत गुप्ता, प्रशांत कवडे; महाराणा रानडे; मनीष देशमुख; पुणेरी वॉरियर्सकडून शंतनू खानापुरेने गोल केला, तर मॅथ्यू एफए कडून सिद्धार्थ ढवळीकर; पृथ्वीराज माने; अॅस्टन मॅथ्यू; आदित्य जाधव यांनी गोल केले. गजानन शिंदे याचा प्रयत्न हुकला.

त्यानंतर भारती एफ सीने इंद्रायणी एस सी ब ससंघाच 1-0 असा पराभव केला. एकमात्र गोल संदीप बारोने 55व्या मिनिटाला केला.

एएफए सॅमफोर्डनेही आगेकूच कायम राखली त्यांनी आई स्पोर्ट्सला 4-0 ने हरवले. विजेत्या संघाकडून श्रावण खडसे (17वे, 34वे), सिद्धार्थ पाटोळे (24वे) आणि एलविन फ्रान्सिस (54वे) यांनी गोल केले.

पिसीएच लायन्स 4 हा दिवसातील शेवटचा विजेता ठरला, त्यांनी इन्फांट्स संघावर 4-1 असा विजय मिळवला. क्लीनिंग लिंगडोह (३१वे ४१वें, ६७वें) शानदार हॅटट्रिक केली. अन्य गोल राजू ववरे आणि आकाश कुद्रे यांनी केले.

निकाल
एस एस पी एम एस मैदान द्वितीय श्रेणी सुपर-8

राहुल एफ ए : 2 (आनंद शेंडे 33 वे रोहित जयसिंघानी 40वे, 51वे) bt एफ सी बेकडिन्हो: 0

घोरपडी तामिळ युनायटेड: 1 (रॉबिन पिल्ले 8वे) वि.वि. न्यू इंडिया सॉकर: 0
द्वितीय श्रेणी रेलीगेशन प्ले-ऑफ

एनडीए युथ क्लब: 3 (गोपाल हुंडेकर 8 वे, 33 वे संदीप सिंग 60+2 वे) वि.वि सुखाई एफसी: 2 (विनय नायर पहिले मिनीट; प्रतीक शिंदे 51 वे)

वानवडी एलेवन ० बरोबरी वी.सनी डेजसह ०

स प महाविद्यालय बाद फेरी
पुणेरी वॉरियर्स: 1(5) (मनीष देशमुख 38वे; अनिकेत गुप्ता, प्रशांत कवडे; महाराणा रानडे; मनीष देशमुख; शंतनू खानापुरे) वी.वी. मॅथ्यू एफए: 1(4) (रोहित जाधव 18वे; सिद्धार्थ ढवळीकर, पृथ्वीराज माने; अस्टन मॅथ्यू, आदित्य जाधव)

ए एफ ए सॅमफोर्ड: 4 (श्रवण खडसे 17वें, 34 वे; सिद्धार्थ पाटोळे 24 वे एल्विन फ्रान्सिस 54 वे) वी.वी साई स्पोर्ट्स: 0

भारती एफ सी 1 (संदीप बारो 55 वे) वी. वी. इंद्रायणी एस सी: 0

पीसीएच लायन्स: 4 (आकाश कुद्रे १८ वे क्लीनिंग लिंगडोह 31वा, 41वा, 67वा; ) वी.वी शिशु: 1 (राजू वावरे 33 वे)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

सहज विजयासह सिटी एफसी पुणे सुपर ८ मध्ये

घोरपडी युनायटेडची आगेकूच कायम; अस्पायर गुणतक्त्यात अव्वल

पीसीएच लायन्स, साई स्पोर्टस, मॅथ्यू एफए, एएफए सॅनफोर्ड बाद फेरीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---