---Advertisement---

विश्वचषक होतं असलेल्या ऑस्ट्रेलियात क्रिकेटला होणार या दिवसापासून सुरुवात

---Advertisement---

यंदाचा आयसीसी क्रिकेट टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलिया देशात होणार आहे. आता याच ऑस्ट्रेलिया देशात स्पर्धात्मक क्रिकेटला आता सुरुवात होणार आहे.

६ जूनपासून डार्विन व डिस्ट्रिक्ट क्रिकेटच्या टी२० स्पर्धा सुरु होतं आहेत. यावेळी खेळाडूंना घाम किंवा लाळ खेळताना चेंडूवर वापरता येणार नाही.

यावेळी चेंडूला चकाकी मिळण्यासाठी वॅक्स अप्लिकेटर वापरता येईल का याचाही विचार डार्विन व डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे व्यवस्थापन करत आहे. हे करताना पंचांचा काय उपयोग होईल यावरही ते सखोल विचार करत आहेत.

यावेळी येथील क्लबंना कोविड सेफ्टी प्लॅन नाॅर्थन टेरिटरी सरकारला सांगावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना हे क्रिकेट खेळता येणार आहे. cricket.com.au. वेबसाईटनुसार अजून काही चर्चा क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी करणेही बाकी आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---