यावर्षी मार्च महिन्यात क्रिकेट जगतात चेंडू छेडछाड प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे क्रिकेटमध्ये पून्हा चूकीचे प्रकार घडू नये म्हणून सध्या आयसीसी कडक पाऊले उचलत आहे.
पण़ पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणून चक्क मुद्दाम नो बॉलचा चेंडू सरळ बाउंड्री लाइनच्या बाहेर फेकला.
ही घटना इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या सॉमरसेट क्रिकेट लीग स्पर्धेत माइनहेड क्रिकेट क्लब विरुद्ध पर्नेल क्रिकेट क्लब या संघांदरम्यान झाली आहे.
झाले असे की माइनहेड संघाला विजयासाठी 2 धावांची गरज होती आणि जे डेरेल या फलंदाजालाही शतकासाठी 2 धावांची गरज होती.
पण त्याचवेळी पर्नेल संघाच्या एका गोलंदाजाने नो बॉलचा चेंडू सरळ बाउंड्री लाइनच्या बाहेर टाकला. यामुळे नो बॉल आणि चौकारामुळे माइनहेड जिंकली परंतू डेरेलचे शतक हुकले. या गोलंदाजाचे नाव अजून उघड करण्यात आलेले नाही.
याबद्दल क्रिकेट वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.
या घटनेबद्दल माइनहेड संघाच्या अॅंगस मार्श या खेळाडूने ट्विट करताना घडलेला प्रकार सांगितला आहे. तसेच त्याने म्हटले आहे की माझ्या आयुष्यातील हा सर्वात वाईच क्षण आहे.
Today I witnessed the worst cricket moment of my life… @MineheadCricket 2s needed 5 runs to win, Jay Darrell was on 95*, never scored a league ton! Purnells bowler THREW the ball for a no-ball 6… embarrassing! @BumbleCricket thoughts?
— Gus. (@MarshAngus) August 4, 2018
तसेत पर्नेल क्रिकेट क्लब संघाच्या कर्णधारानेही माइनहेड क्रिकेट क्लबची माफी मागितली आहे.
Update – Thank you @skysportscric @robkey612 @BumbleCricket for sticking up for this pic.twitter.com/zpau7vvwpj
— Gus. (@MarshAngus) August 4, 2018
या घटनेनंतर पर्नेल क्रिकेट क्लब संघानेही ट्विटरवरुन माफी मागताना म्हटले आहे की, “काल आमच्या संघातील एका खेळाडूने माइनहेड विरुद्ध खिलाडूवृत्तीने खेळ केला आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
“परंतू या प्रक्रियेदरम्यान खेळाडू ओळख उघड करु इच्छित नाही. पण यात आर कॅसलिंगचा काही संबंध नाही असे आम्ही सांगू शकतो. आम्ही या घडनेकडे गंभीरतेने पाहत आहोत.”
— Purnell Cricket Club (@purnellcc) August 5, 2018
तसेच या घटनेवर माइनहेड संघाच्या कर्णधार रू वूडवर्डनेही ट्विटरवर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी खुप क्रिकेट खेळले आहे आणि पाहिले आहे. पण अशी गोष्ट पहिल्यांदाच पाहत आहे. त्याचे ते पहिलेच शतक होते.
“परंतू गोलंदाजाने चेंडू बाउंड्रीबाहेर फेकला आणि त्यानंतर त्याच्या या कृतीला त्याच्या संघसहकाऱ्यांनी त्याला हासून दाद दिली. हे खुपच वाईट होते.”
Iv played & seen a lot of cricket in my time and Iv never seen anything like that before @MineheadCricket 2s. A young lad on for his first league 💯 and the bowler throws in over the ropes 🙈 and then laughs about it. Credit to his team they were just as disgusted.
— Roo Woodward (@razziabou) August 4, 2018
असे असले तरी जे डेरेल या फलंदाजाने त्याला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करताना म्हटले आहे की, “ज्याप्रकारे सामना संपला त्याबद्दल वाईट वाटते. मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”
https://twitter.com/JayDarrell1/status/1025842191036555264
क्रिकेटमध्ये या आधीही असे प्रकार घडले आहेत. कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये 2017 ला विंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने एविन लुइस 97 धावांवर असताना नो बॉल टाकला होता.
तसेच 2010 मध्ये विरेंद्र सेहवाग 99 धावांवर असताना श्रीलंकेच्या सूरज रणदीवने नो बॉल टाकला होता. ज्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी आली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर
–हे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून
–जय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु