पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत पहिल्या दिवशी सुजित उबाळे(43-6)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 127 धावांवर गुंडाळत आजचा दिवस गाजवला.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत तीन दिवस चालणाऱ्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने जिंकला व त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्लब ऑफ महाराष्ट्रच्या सुजित उबाळे(6-43)याने केलेल्या अचूक माऱ्यापुढे व्हेरॉक संघ 44.2षटकात 127धावावर संपुष्टात आला. व्हेरॉक संघ 28धावात 5 गडी बाद असा अडचणीत असताना मिझान सय्यदने एकाबाजूने लढताना 63 चेंडूत 4चौकार व 1षटकारांच्या मदतीने 40धावांची संय्यमपूर्ण खेळी केली. मिझानला रोहित जनाने 16 धावा काढून सुरेख साथ दिली. मिझान सय्यद व रोहित जना यांनी सहाव्या गडयासाठी 88 चेंडूत 37धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर शुभम तैस्वालने 37 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्यास हातभार लावला.
दिवसअखेर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 8षटकात 1बाद 16धावा केल्या आहेत. यात राजवर्धन उंडरे नाबाद 10धावा, संकेत चव्हाण नाबाद 0 धावसंख्येवर खेळत आहे.व्हेरॉक व क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.2षटकात सर्वबाद 127धावा(मिझान सय्यद 40(63,4×4,1×6), शुभम तैस्वाल 34(37,5×4), रोहित जना 16(48), पवन शहा 15(19), सुजित उबाळे 17.5-43-6, सय्यद आतिफ जमाल 2.3-9-1, वैभव गोसावी 13-38-1)वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 8षटकात 1बाद 16धावा(राजवर्धन उंडरे नाबाद 10(32,2×4), संकेत चव्हाण नाबाद 0, मनोज यादव 4-9-1);