महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य लोकांत मिसळत असल्याने कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे हे रूप पुन्हा एकदा पाहण्यात आले. ठाणे येथे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी एका स्थानिक स्पर्धेत टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. त्यावेळी त्यांनी केलेल्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे नुकतेच दावोस येथे रवाना झाले. इकॉनॉमिक फोरमच्या या बैठकीत ते सहभागी होतील. दावोसला जाण्यापूर्वी शिंदे यांनी नुकतीच त्यांचे राजकीय गुरू मानल्या जाणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाला ठाणे येथे भेट दिली. त्यानंतर, ठाण्यातील राजकीय नेते निखिल बुडजडे यांनी आयोजित केलेल्या धर्मवीर आनंद दिघे चषक या टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांना फलंदाजी करण्याची विनंती केली गेली.
https://twitter.com/Sagar_Kabir10/status/1615236537670828032?s=20&t=GmCUjvPK1xFLfwftM0eBQQ
आयोजक व कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत त्यांनी फलंदाजी केली. त्यांनी चार चेंडूंचा सामना करत प्रत्येक चेंडूवर जोरदार प्रहार केला. त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय. काहींनी त्यांच्या या क्रिकेटप्रेमाबद्दल त्यांचे कौतुक केले.
मागील काही काळापासून अनेक राजकीय नेते क्रिकेटच्या मैदानावर दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तसेच, काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील कार्यक्रमात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलेला. त्यावेळी त्यांच्यासह भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव व मिताली राज हे देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त खासदार संजय राऊत, आमदार रवी राणा व गुलाबराव पाटील यांनी देखील क्रिकेटच्या मैदानावर आपले कसब दाखवलेले.
(CM Eknath Shinde Batting In Cricket Tournament In Thane)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश
‘या’ पक्षाने केली सूर्यकुमार यादवची नक्कल! संघसहकारी अर्शदीपही म्हणाला, ‘पाजी तुमची कॉपी…’