भारतीय संघाचा दिग्गज माजी कर्णधार सौरव गांगुली याचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्याच्या जागी नवीन अध्यक्ष नेमला जाणार आहे. अशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीचे समर्थन केले आहे. गांगुली बंगालच्या क्रिकेट संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आपली दावेदारी ठोकणार आहे. त्याला बंगाल क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायचे आहे. यादरम्यान आता ममता बॅनर्जी यांनी गांगुलीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
सौरव गांगुली करणार नवीन डावाची सुरुवात
सौरव गांगुली (Sourav Ganguly) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. यानंतर तो लवकरच नवीन डावाची सुरुवात करणार आहे. नुकतेच असे वृत्त आले होते की, भारतीय बोर्डांच्या बैठकीत गांगुलीच्या जागी बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्या नावाला संमती दर्शवली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. बीसीसीआय अध्यक्ष पदावरून हटल्यानंतर गांगुली पुन्हा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (Bengal Cricket Association) अध्यक्ष पदाची निवडणूक लढवेल. गांगुलीने नुकतेच माध्यमांशी बोलताना कॅबच्या (CAB) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल सांगितले होते.
काय म्हणाल्या ममता?
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपील केली आहे की, त्यांनी आयसीसी निवडणुकीमध्ये गांगुलीला उतरवण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा करावी. त्या म्हणाल्या की, “सौरवने योग्य अध्यक्ष म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याला बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून हटवल्यामुळे मी हैराण आहे. हा त्याच्यासोबत अन्याय आहे. मी पंतप्रधानांना विनंती करते की, त्यांनी सौरवला आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची परवानगी मिळेल, याचे आश्वासन द्यावे.”
“सौरव का नाकारला गेला? त्याचा काय दोष होता? देशातील आणि जगातील प्रत्येकजण त्याला ओळखतो. त्याला कसे नाकारले गेले हे पाहून मला धक्का बसला आहे. याला राजकीय आणि सूडबुद्धीने घेऊ नका. तो राजकारणी नाही. त्याच्यासाठी आणि क्रिकेटसाठी निर्णय घ्या,” असेही ममता पुढे बोलताना म्हणाल्या.
गांगुलीने 2015मध्ये सांभाळले होते कॅबचे अध्यक्षपद
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने यापूर्वीही बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले आहे. सन 2015मध्ये गांगुलीने जनमोहन डालमिया यांच्या निधनानंतर कॅबचे अध्यक्षपद सांभाळले होते. जेव्हा 2019मध्ये गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनला, तेव्हा त्याने हे पद सोडले होते. आता ऑक्टोबर 2019नंतर तो पुन्हा एकदा या पदासाठी आपली दावेदारी ठोकेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चेंडू मारण्याची इच्छाच होत नाहीये यार’, म्हणताच पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार आऊट; आवाज कॅमेऱ्यात कैद
श्रीलंकेपाठोपाठ वेस्ट इंडिजही गारद, स्कॉटलंडचा दोन वेळेच्या चॅम्पियनवर 42 धावांनी विजय