इंग्लंडविरुद्ध वनडेत ५-०ने पराभव झालेल्या टीम आॅस्ट्रेलिया लवकरच वनडे संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. याचे स्पष्ट संकेत या संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी दिले आहेत.
“कर्णधार टीम पेन हा वनडेत कशी कामगिरी करतोय यावर आम्ही कर्णधारपदाचा निर्णय घेऊ. तो जर चांगल काम करत असेल तर नक्कीच कर्णधारपद त्याच्याकडे राहिल. जर त्याने खराब कामगिरी केली तर मात्र आम्ही कर्णधार बदलण्याचा निर्णय घेऊ.” असे या संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक लॅंगर म्हणाले.
सध्या २०१९ विश्वचषकाला बराच वेळ असल्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलिया याबद्दल काय निर्णय घेते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु सध्या टी२० संघाचं नेतृत्व करणारा अॅराॅन फिंच मात्र या पदासाठी इच्छुक आहे. त्याने तसे वेळोवेळी बोलुनही दाखवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड