ऑकलँड। आज(8 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात इडन पार्कवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 22 धावांनी विजय मिळवला आणि वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पण याच सामन्यात एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली. ती म्हणजे न्यूझीलंडचा सध्याचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज ल्यूक राँची क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला होता.
असे झाले कारण न्यूझीलंडचे अनेक खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राखीव क्षेत्ररक्षकांची कमी आहे. न्यूझीलंडने या सामन्याआधी केवळ मिशेल सँटेनरचे नाव राखीव क्षेत्ररक्षक म्हणून दिले होते. मात्र त्यालाही पोटाचा त्रास होत असल्याने त्याने क्षेत्ररक्षण केले नाही. तसेच न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन सध्या खांद्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. तर स्कॉट कुग्लेजिनला फ्लू आहे.
त्यामुळे अखेर 37 व्या षटकादरम्यान राँची न्यूझीलंडची जर्सी घालून मैदानात उतरला होता.
New Zealand fielding's coach Luke Ronchi comes to field as they haven't any substitute player due to injuries very rare😊😊#NZvIND pic.twitter.com/suGahxQR5j
— Mubasher Saleem (@Mubasher_08) February 8, 2020
https://twitter.com/SteadyTheShip/status/1226071545149349893
विशेष म्हणजे साधारण 1 महिन्यापूर्वीच अशीच गोष्ट न्यूझीलंड संघाबरोबर घडली होती. न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटी सामना खेळत असाताना न्यूझीलंडचे अनेक खेळाडू आजारी तसेच दुखापतग्रस्त होते. त्यामुळे न्यूझीलंडने गरज पडल्यास त्यांचे फलंदाजी प्रशिक्षक पिटर फल्टनला क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार राहण्यासाठी सांगितले होते.
Peter Fulton is in the whites with Jeet Raval the latest to suffer from the flu 😷 Boys fighting on the park – Will Somerville with the early wicket of Wade 🏏
🇦🇺 CARD | https://t.co/EPIJotM8GY#AUSvNZ #cricketnation pic.twitter.com/5agcuwhi4i
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 4, 2020
तसेच त्याआधी 2019 विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघाच्या सराव सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगहुड क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता. इंग्लंडचे मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे दोन खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने कॉलिंगवूडला हा निर्णय घ्यावा लागला होता. तो वूडची जर्सी घालून राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता.
A familiar face on the ground for England! Assistant coach Paul Collingwood is on as a sub fielder …
LIVE: https://t.co/XmIL50L3k8 #CWC19 pic.twitter.com/ZPnWPS1X5z
— cricket.com.au (@cricketcomau) May 25, 2019
आज न्यूझीलंडकडून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या राँचीने न्यूझीलंडकडून शेवटचा सामना 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्ध खेळला आहे. तसेच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना त्याने आयसीसी विश्व एकादश संघाकडून वेस्ट इंडिज विरुद्ध 2018मध्ये खेळला आहे.
विशेष म्हणजे राँची ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड संघाकडून खेळला आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून 2008 ते 2009 दरम्यान खेळला. तर 2013 पासून तो न्यूझीलंडकडून खेळला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 कसोटी, 85 वनडे आणि 33 टी20 सामने खेळले आहेत.
२०१९ विश्वचषकानंतरचा टीम इंडियाचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला
वाचा👉https://t.co/zpCgyrG7Ok👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
विराट कोहलीच्या १२ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ही नकोशी गोष्ट
वाचा👉https://t.co/fTdER82YMO👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020