---Advertisement---

….म्हणून मोहम्मद आमिरला वगळले होते, प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने केला खुलासा

---Advertisement---

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मागील महिन्यात सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आमिरने आपल्या निवृत्तीचे कारण मिसबाह उल हक व वकार युनिस यांना म्हटले होते. यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाहची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने आमिरला संघात न घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

एका रिपोर्टनुसार मिसबाह म्हणाला की, वकार युनीस संदर्भात जे बोलले जात आहे ते पूर्णतः चुकीचे आहे. संघ निवडताना तिथे इतर सहा लोक व कर्णधार देखील असतो. एवढे सगळे लोक संघ निवडत असताना केवळ एक व्यक्ती एखाद्या खेळाडूला संघातून वगळू शकत नाही. आमिरच्या प्रदर्शनामुळे त्याला संघात घेण्यास कोणीही तयार नव्हते. आमिरच्या हातात एकच गोष्ट होती, ती म्हणजे त्याने पुन्हा स्थानिक क्रिकेट खेळावे व उत्तम कामगिरी करून संघात पुनरागमन करावे.

मिसबाह पुढे म्हणाला की आमिरने मागील वर्षी झालेल्या इंग्लंड दौ-यात खेळण्यास नकार दिला होता. आमिरला समजवण्याचा संपूर्ण संघ व्यवस्थापनाने प्रयत्न केला मात्र आमिर तयार नव्हता. आमिरने नंतर संघात खेळण्यास होकार दर्शवला व त्याचा संघात समावेश करण्यात आला. आमिरचे संघात पुनरागमन झाले तेव्हा मी कर्णधार होतो व मी त्याला पुर्ण मदत केली असल्याचे देखील मिसबाहने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

न्यूझीलंडकडून पहिल्यांदा १०० बळी घेण्याचा मान ते अवघ्या २९व्या वर्षी निवृत्ती! जाणून घ्या या किवी खेळाडूची रोमांचक कहाणी

चौथ्या कसोटी सामन्यात भारत मिळवणार विजय, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दर्शविला विश्वास 

हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---