---Advertisement---

हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 4:41 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. चौथ्या डावात ४०७ धावांचे आव्हान मिळाले असताना भारताने चार सत्रात संपूर्ण १३१ षटके खेळून काढत सामना अनिर्णीत राखला. यात आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी तर जवळपास अडीच सत्र किल्ला लढवत एकही गडी बाद होणार नाही याची काळजी घेतली. यात विशेषतः हनुमा विहारीने दुखापत झाली असतानाही दिलेली झुंज पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले होते.

मात्र भाजप नेते बाबुल सुप्रियो हे विहारीच्या खेळीवर नाराज असल्याचे दिसून आले. सामन्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत लिहिले की, “७ धावा करण्यासाठी हनुमा विहारीने १०९ चेंडू खेळले. विहारीने केवळ ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या भारतीय संघाच्या सर्व शक्यतांना मारुन टाकले नाही, तर अक्षरश: क्रिकेटची हत्या केली.”

त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. आता हनुमा विहारीनेही त्यांना प्रत्युतर दिले आहे. हनुमा विहारी त्यांना तिखट भाषेत प्रत्युतर देईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याने बाबुल सुप्रियो यांच्या ट्विटमधील केवळ व्याकरणाची चूक दुरुस्त करत त्याने त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले. सुप्रियो यांनी बिहारी असे लिहिले होते, मात्र ते विहारी असल्याचे हनुमाने लक्षात आणून दिले.

त्याच्या या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. टीकेला प्रत्युतर देऊन वादाला आमंत्रण देण्याऐवजी त्याने निवडलेला हा मार्ग चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, या दिग्गज अष्टपैलूचे पुनरागमन 

ब्रिस्बेन में आप ही खेलो शुक्ला जी! त्या ट्विटमुळे सोशल मिडीयावर राजीव शुक्ला होत आहेत ट्रोल

सिडनी कसोटीतील कामगिरीचा जडेजाला फायदा, अष्टपैलूंच्या क्रमवारीत पोहोचला या स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---