---Advertisement---

सिडनी कसोटीतील कामगिरीचा जडेजाला फायदा, अष्टपैलूंच्या क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानी

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 11:33 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकताच मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत पराभवाच्या गर्तेतून सामना अनिर्णित अवस्थेत रोखला. सामन्यादरम्यान संपूर्ण भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याची क्रिकेटरसिकांना जाणीव करून दिली.

या सामन्यात दुखापत होण्यापूर्वी रवींद्र जडेजाने गोलंदाजी व फलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाने 4 फलंदाजांना बाद केले तसेच एका अप्रतिम थ्रोवर स्टीव स्मिथला धावबाद केले. फलंदाजित जडेजाने नाबाद 34 धावा केल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असताना जडेजाच्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यातून बाहेर झालेला आहे. जडेजासाठी ही वाईट बातमी समोर येत असतानाच एक आनंदाची बातमी देखील आली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी रँकिंगमध्ये तो क्रमांक दोन वर पोहोचला आहे.

जडेजा 428 पॉईंट सह क्रमवारीत एका स्थानाची झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 440 पॉइंट्ससह इंग्लंडचा बेन स्टोक्स प्रथम क्रमांकावर आहे. तर जेसन होल्डर, शाकिब अल हसन व काईल जेमिनसन अनुक्रमे 3,4 व 5 क्रमांकावर आहेत. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन देखील या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असून हे दोनच भारतीय खेळाडू अष्टपैलूंच्या टॉप 10 मध्ये आहेत.

जडेजाच्या हाताला झालेल्या दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून भारतीय संघाला आशा असेल की तो इंग्लंड विरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत संपूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमन करेल.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! भारताची फुलराणी सायना नेहवालचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; थायलंड ओपनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

धक्कादायक! दहशतवाद्यांच्या बातमीसोबत छापला विराट-अनुष्काचा फोटो, सोशल मीडियावर कडाडून टीका; पाहा फोटो

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या तक्रारींची बीसीसीआयकडून दखल, ब्रिस्बेनच्या हॉटेलमध्ये सोयी-सुविधांचा अभाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---