---Advertisement---

मोठी बातमी! भारताची फुलराणी सायना नेहवालचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; थायलंड ओपनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 9:09 AM
---Advertisement---

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भारताला थायलंड ओपन स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसला होता. सायनासह पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र हे रिपोर्ट आता चुकीचे असल्याचे सिद्ध झाले असून या दोघांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सायना आणि प्रणॉय या दोघांचाही थायलंड ओपन स्पर्धेत भाग घ्यायचा मार्ग मोकळा झाला आहे.

सायना आणि प्रणॉय यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघाने वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांची अॅन्टिबॉडी टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजेच यापूर्वी कधीतरी या दोघांना कोरोना होऊन गेला असावा, मात्र आता त्या विरोधातील अॅन्टिबॉडीज त्यांच्या शरीरात असल्याचे सिद्ध झाले. या सगळ्या सिलसिल्यानंतर आता सायना आणि प्रणॉय आपल्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सामने खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://twitter.com/bwfmedia/status/1348990473705299972?s=08

बऱ्याच काळानंतर भारतीय बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असल्याने या थायलंड ओपन स्पर्धेबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची आहे. आजपासून (१३ जानेवारी) या स्पर्धेला सुरुवात होत असून सलामीच्या दिवशीच १३ भारतीय बॅडमिंटनपटू थायलंड ओपनच्या कोर्टवर आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी झुंजताना दिसतील.

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये होणार क्वारंटाईन

आएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्टविरुद्ध भेकेच्या गोलमुळे बेंगळुरूला बरोबरीचा दिलासा

दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---