---Advertisement---

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध वनडे संघात निवड समिती मोठे बदल करण्याची दाट शक्यता! असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2026 7:16 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (ODI Series Between Team india vs Srilanka) यांच्यातील वनडे मालिकेला 13 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 29 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. या संघात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघात काही महत्त्वाचे बदल करण्याचा विचार प्रज्ञान ओझा (Pragyaan Ojha) यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती करत आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचा निवड समितीचा प्रयत्न असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे सामन्यांत भारतीय संघ सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानात उतरला नव्हता. त्यामुळे आता शुबमन गिलचे (Captain Shubman Gill) वनडे संघात कर्णधार म्हणून पुनरागमन निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत तिलक वर्माला (Tilak verma) संघातून बाहेर बसावे लागू शकते.

याशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली, नमन धीर आणि श्रेयस अय्यर यांना संघात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, ऋतुराज गायकवाडला संघातून वगळले जाऊ शकते. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालचे वनडे संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, नमन धीर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन (यष्टिरक्षक), के. एल. राहुल (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---