---Advertisement---

कोच द्रविडने विराटवर उधळली स्तुतीसुमने, युवा खेळाडूंना ‘रनमशीन’कडून घ्यायला सांगितला धडा

Rahul-Dravid-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने भल्याभल्या दिग्गजांचे विक्रम मोडीत काढून कारकीर्दीचे शिखर गाठले आहे. तो जेव्हाही विक्रम करतो, तेव्हा त्याची प्रशंसा करण्यासाठी आजी-माजी खेळाडूही रांगा लावतात. यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही समावेश आहे. द्रविड यांचे असे म्हणणे आहे की, क्रिकेटची जाण असणाऱ्या विराटला सहजरीत्या सामन्यादरम्यान कधी आक्रमक व्हायचे आणि कधी नियंत्रण मिळवायचे हे चांगलेच माहिती आहे. द्रविड या गोष्टीनेही प्रभावित झाले की, विराट सरावादरम्यानही ही गोष्ट कायम पाळतो.

विराट कोहली (Virat Kohli) दीर्घ काळ खराब फॉर्माचा सामना केल्यानंतर यावर्षी यूएईमध्ये झालेल्या आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेदरम्यान पुनरागमन केले केले. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक 2022मध्येही शानदार लयीत असतो. मागील आठवड्यातच भारतीय कर्णधाराने आपला 44 वे वनडे शतक साजरे केले.

राहुल द्रविड (Rahul Dravid) याने बीसीसीआयच्या व्हिडिओत म्हटले की, “विराटला माहिती आहे की, कधी आक्रमक व्हायचे आणि कधी खेळावर नियंत्रण मिळवायचे. त्याला पाहताना शानदार वाटते. तसेच, तो जेव्हा डाव पुढे घेऊन जातो, तेव्हा ते आमच्यासाठी एक चांगला संकेत असतो. विराटचा 50 षटकाच्या क्रिकेटमध्ये शानदार विक्रम आहे. त्याने जेवढे सामने खेळले आहेत, ते सर्व अद्भुत आहे.”

https://twitter.com/BCCI/status/1603267134276390913

द्रविड असेही म्हणाले की, विराट फॉर्ममध्ये असो किंवा नसो, सरावादरम्यानची त्याची आवड कधीही कमी होत नाही. तसेच, संघातील युवा खेळाडू त्याच्याकडून शिकू शकतात. तो म्हणाला, “मी त्याला जेव्हापासून पाहिले आहे, तेव्हापासून तो अशाचप्रकारे कडक सराव करतो. तो फॉर्ममध्ये असो किंवा नसो. तो यामध्ये जरादेखील बदल करत नाही. संघातील युवा खेळाडूंसाठी हा एक चांगला धडा आहे.”

विराटबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय ताफ्यात सामील आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट 5 चेंडूत 1 धाव करून बाद झाला होता. तसेच, भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या आहेत. या आव्हानापासून बांगलादेश संघ अद्याप 271 धावा दूर आहे. (coach rahul dravid praised virat kohli s biggest quality and talked on wtc final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या कोचने मागितली राहुल द्रविडची माफी; धक्कादायक कारण आले समोर
विराट आणि स्लेजिंग म्हणजे जुणं नातं! सिराजने लिटन दासला बाद करतानाच केले ‘हे’ कृत्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---