टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताला मिराबाई चानूमुळे वेटलिफ्टिंगमध्ये ‘रौप्य’ पदक मिळाले आहे. अशातच आता ऍथलिट्सच्या प्रशिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने शनिवारी (२४ जुलै) ऍथलिट्ससोबत टोकियो ऑलिंपिकमध्ये असणाऱ्या आणि त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.
ज्या प्रशिक्षकाने ऍथलिटला ‘सुवर्ण’ पदक जिंकण्यासाठी मदत केली आहे, त्या प्रशिक्षकाला १२. ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच ज्या प्रशिक्षकाने ऍथलिटला ‘रौप्य’ पदक जिंकण्यासाठी मदत केली आहे, त्याला १० लाख रुपये आणि ‘कांस्य’ पदक जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकाला ७.५ लाख रुपये दिले जाणार असल्याचे वृत्त ऍनी वृत्तसंस्थेने दिले आहे. (Coaches who are in Tokyo with athletes and have trained them will be given cash rewards)
Coaches who are in Tokyo with athletes and have trained them will be given cash rewards. It will be a huge morale booster for them. Vijay Sharma Mirabai Chanu's coach will be given Rs 10 lakhs: IOA Secretary General Rajeev Mehta to ANI
— ANI (@ANI) July 24, 2021
“जे प्रशिक्षक खेळाडूंसोबत येथे आहेत आणि त्यांना ट्रेनिंग दिली आहे, अशा प्रशिक्षकांना रोख बक्षीसे दिली जातील. त्यांच्यासाठी हे मनोबल वाढवणारे असेल. विजय शर्मा, मिराबाई चानू यांच्या प्रशिक्षकांना १० लाख रुपये मिळणार आहेत,” असे ऍनी वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष राजीव मेहता म्हणाले.
मिराबाईने ४९ किलो वजनी गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. यावेळी चानूने स्नॅच ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले. दुसरीकडे चीनच्या हौ झीहुइने एकूण २१० किलो वजनासह एक ऑलिंपिक विक्रम स्थापित केला आणि ‘सुवर्ण’ पदक आपल्या देशाला मिळवून दिले. दुसरीकडे इंडोनेशियाच्या विंडी कँटिका ऐसाने एकूण १९४ किलो वजनासह ‘कांस्य’ पदक आपल्या नावावर केले.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Weightlifting
Women's 49kg ResultsSilver lined beginning for India! @mirabai_chanu wins Silver medal in @Tokyo2020 Weightlifting becoming the only 2nd Indian weightlifter ever to win an #Olympics medal. #WayToGo champ #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/oNqElqBGU2
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
“रिओ ऑलिंपिकचा धक्का आम्हाला येथे घेऊन आला आहे. प्रशिक्षकाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. जर खेळाडू शिस्तबद्ध नसेल, तर प्रशिक्षकही काही करू शकत नाही. मी म्हणेन की या कामगिरीमागे मिराबाई चानूची मोठी भूमिका आहे. ती खूप समर्पित आहे आणि त्या कारणामुळेच तिने ‘रौप्य’ पदक जिंकले आहे,” असे ऍनीशी बोलताना शर्मा म्हणाले.
आपल्या ‘रौप्य’ पदकासह मिराबाई ही ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी कर्नम मल्लेश्वरी यांच्यानंतर दुसरी भारतीय वेट लिफ्टर बनली आहे. कर्नम यांनी सन २००० मध्ये सिडनी ऑलिंपिकमध्ये ६९ किलो वजनी गटात पहिल्यांदा ‘कांस्य’ पदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताच्या अपेक्षांवर पाणी! चीनविरुद्ध टेबल टेनिसच्या मिश्र गटात शरत अन् मनिका पराभूत
-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक