इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने बाजी मारून आयपीएलच्या इतिहासात पाचव्या वेळी किताबावर नाव कोरले, तर दिल्लीने पहिला किताब जिंकण्याची संधी गमावली. मात्र, मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धने याने एक खास पराक्रम केला आहे.
त्याने प्रशिक्षक म्हणून सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकणाच्या स्टिफन फ्लेमिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. जयवर्धनेने आणि फ्लेमिंग यांनी प्रत्येकी 3 वेळा आयपीएल ट्रॉफी प्रशिक्षक म्हणून जिंकली आहे.
या लेखात आपण आयपीएलमधील अशा प्रशिक्षकांची माहिती सांगणार आहोत ज्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यश आले आहे.
महेला जयवर्धने – मुंबई इंडियन्स (3 वेळा)
मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धने याला मेहनतीचं फळ मिळालं. प्रशिक्षक म्हणून त्याने मुंबईला 3 वेळा किताब जिंकवून दिला आहे. सन 2017, 2019 आणि 2020 या तीन हंगामात मुंबईने आयपीएलचे जेतेपद पटकावले.या तीनही हंगामात महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक होता.
स्टीफन फ्लेमिंग- चेन्नई सुपर किंग्ज ( 3 वेळा)
आयपीएल कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्जने 3 वेळा किताब जिंकला आहे. सन 2010, 2011 आणि 2018 या तीन हंगामात चेन्नईने किताबावर नाव कोरले होते. या तीनही हंगामात न्यूझीलंडचा माजी दिग्गज स्टीफन फ्लेमिंग चेन्नईचा प्रशिक्षक होता
ट्रेवर बायलिस – कोलकाता नाईट रायडर्स (2 वेळा)
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ट्रेवर बायलिस यांनी कोलकाताला प्रशिक्षक म्हणून 2 वेळा किताब जिंकवून दिला आहे. सन 2012 आणि 2014 या दोन हंगामात कोलकाताने किताब जिंकला होता आणि या दोन्ही हंगामात ट्रेवर बायलिस संघांचे प्रशिक्षक होते.
शेन वॉर्न – राजस्थान रॉयल्स ( 1 वेळा)
सन 2008 साली ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सला किताब जिंकवून दिला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे तो या संघाचा कर्णधारही होता
डॅरेन लेहमान – डेक्कन चार्जेर्स (1 वेळा )
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज डॅरेन लेहमान याने सन 2009 साली डेक्कन चार्जेर्स या संघाला जेतेपद मिळवून दिले होते.
जॉन राईट – मुंबई इंडियन्स (1 वेळा)
सन 2013 साली मुंबईने पहिल्यांदाच किताब जिंकला होता. माजी क्रिकेटपटू जॉन राईट यांनी प्रशिक्षक म्हणून मुंबईला किताब जिंकवून दिला होता.
रिकी पॉंटिंग – मुंबई इंडियन्स ( 1 वेळा )
सन 2015 साली मुंबईने दुसऱ्यांदा किताबावर नाव कोरले. या हंगामात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग मुंबईचा प्रशिक्षक होता.
टॉम मुडी – सनरायझर्स हैदराबाद (1 वेळा )
सन 2016 साली सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. या हंगामात ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू टॉम मुडी या संघांचे प्रशिक्षक होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वाह क्या बात हैं! १० वर्षांत मुंबई इंडियन्सने जिंकल्यात ७ फायनल्स
काय सांगता ! १३ वर्षात ६ आयपीएल विजेतेपदे; रोहित बनला आयपीएलचा बेताज बादशाह
फेअरप्ले अवॉर्ड ! आयपीएल २०२० मध्ये ‘या’ संघाची फेअरप्ले अवॉर्डवर मोहोर