भारत आणि श्रीलंका संघांमध्ये वनडे आणि टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र, या मालिका सुरु होण्यापूर्वीच यजमान श्रीलंका संघातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या दौऱ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. बदलल्या वेळापत्रकानुसार आता भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामन्यांना 13 जुलैऐवजी 18 जुलैपासून सुरुवात होईल. तरी, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता श्रीलंकेने दुसऱ्या दर्जाचा संघ देखील तयार ठेवला आहे, जेणेकरून जर मुख्य संघ वेळेवर खेळू शकला नाही, तर दुसरे खेळाडू तयार असतील.
परंतु, समालोचक आकाश चोप्राच्या मतानुसार श्रीलंकाचा पहिला संघ देखील तुलनेने कमजोर आहे. या श्रीलंका संघाला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर एकदाही विजय मिळवता आला नाही. टी20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडकडून सर्व सामन्यात पराभूत झाला. यापूर्वी बांगलादेशविरुद्धही श्रीलंकेची कामगिरी चांगली झाली नव्हती. अशा परिस्थितीत श्रीलंका संघासमोर कोरोनाचेही संकट उभे आहे. त्यामुळे त्यांना २ संघ तयार ठेवावे लागत आहे.
याबद्दल आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, ‘श्रीलंकेने दोन संघ तयार ठेवले आहेत. इंग्लंडहून परतलेला संघ विलगिकरणात आहे. तर दुसरा संघ दांबुला येथे सामन्यांचा सराव करत आहे. परंतु, जरा विचार करायची गोष्ट आहे की, श्रीलंकेचा मुख्य संघ देखील कमकुवत आहे.’
द्विपक्षीय मालिकेचे महत्त्व राहणार नाही
भारतीय संघ श्रीलंका दौर्यावर जात असताना खूप चर्चा झाली. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला चांगला संघ आहे आणि म्हणूनच इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या मुख्य संघातील खेळाडूंच्या अनुपस्थितीचा या संघावर परिणाम होऊ शकणार नाही.
चोप्राने लक्षात आणून दिले की, जर श्रीलंकेने आपला दुसऱ्या दर्जाचा संघ भारताविरुद्ध मैदानात उतरवला तर द्विपक्षीय मालिकेची संपूर्ण मजा संपून जाईल. कारण श्रीलंकेचा मुख्य संघही तुलनेने कमकुवतच आहे.
श्रीलंकेचा संघ कामगिरीमुळे समीक्षकांच्या निशाण्यावर आहे. आकाश चोप्रा म्हणाला की, ‘जर श्रीलंकेचा दुसर्या दर्जाचा संघात मैदानात उतरला, तर हे सामने रोमांचक होण्याची फारशी आशा नाही. द्विपक्षीय मालिकेला काहीच अर्थ राहणार नाही. श्रीलंकेच्या माजी खेळाडूंचे मत आहे की, श्रीलंकेचा प्रमुख संघ भारतीय संघाविरुद्ध एकाही सामन्यात विजय मिळवला तर तो कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी असणार. कारण श्रीलंकाचा मूख्य संघ भारताच्या दुसऱ्या दर्जाच्या संघापेक्षा कमकुवत दिसून येत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेहून महत्त्वाची बातमी! यजमान संघाच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल आला पुढे; जाणून घ्या रिझल्ट