मिराबाई चानूने भारतीयांच्या हृद्यात एक विशेष स्थान बनवले आहे. तिने राष्ट्रकुल 2018 च्या स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
या सगळ्यामध्ये कोणाचेही तिच्या कानातल्या असणाऱ्या ऑलम्पिक्स सारख्या दिसणाऱ्या रचना असणाऱ्या रिंगकडे लक्ष गेले नसेल.
जेव्हा तिला याबद्दल विचारले असता ती म्हणाली,” 2016 च्या रीयो ऑलम्पिक्समधील खराब प्रदर्शनानंतर मी खुप उदास झाले होते. म्हणुन मला प्रोत्साहन देण्यासाठी आईने हे कानातले भेट दिले.”
48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचवत तिने राष्ट्रकुल 2018 स्पर्धेत हा विक्रम केला आहे. यापूर्वी या वजनी गटात अशी कामगिरी कुणालाही करता आली नाही.
तिने स्वत: हा चा 194 किलो वजनाचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम तिने मागच्या वर्षी वर्ल्ड वेटलिफिंग चॅम्पियनशिपमध्ये केला होता. स्नॅच(८६ किलो) आणि क्लीन अँड जर्क प्रकारात (११० किलो) असे एकूण (१९६ किलो) वजन उचलत तिने विक्रम केला होता.
2014 च्या ग्लासगो मधील राष्ट्रकुल स्पर्धेत तिने 48 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले होते. म्हणुन ती 2016 च्या रीओ ऑलम्पिक्ससाठी पात्र ठरली.
रियो ऑलम्पिक्समध्ये तिची कामगिरी निराशाजनक होती. यामुळे ती या खेळाला कायमचा बाय-बाय करणार होती. आईने दिलेल्या प्रोत्साहनाने तिने परत या खेळात येण्याचा निर्णय घेतला.
आत्ताच झालेल्या गोल्ड कोस्टमधून मिळवलेल्या पदकाने तिच्या टोकियो ऑलम्पिक्ससाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.