---Advertisement---

एबी डिव्हीलीअर्स आज तिथेच अाहे, विराट बराच पुढे गेला आहे!

On: शनिवार, फेब्रुवारी 17, 2018 5:53 PM
---Advertisement---

सेंच्युरीयन | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना अनेक विक्रम केले. याच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १७०००धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे झाला. 

हे करताना त्याने एक खास विक्रम केला आहे. तो म्हणजे वनडेत ३५ शतक करण्याचा. विराटने २०८ वनडेत २०० डावात ३५वेळा नाबाद राहत त्याने ५८.१०च्या सरासरीने तब्बल ९५८८ धावा केल्या आहेत.

असे करताना त्याने प्रथमच कारकिर्दीत दक्षिण आफ्रिचा महान खेळाडू एबी डिव्हीलीअर्सला वनडेत मागे टाकले आहे. एबीने २२८ सामन्यात ५३.५०च्या सरासरीने ९५७७ धावा केल्या असून विराटने त्याला ११ धावांनी मागे टाकले आहे. 

जानेवारी २०१पर्यंत एबी डिव्हीलीअर्सच्या नावावर वनडेत २३ तर कसोटीत २१ शतके केली होती तर विराटने तेव्हा वनडेत २३ तर कसोटीत ११ शतके केली होती.

आज एबी डिव्हीलीअर्सच्या नावावर वनडेत २५ तर कसोटीत २१ शतके असुन विराटने यात चांगली भर घातली. आज विराटच्या नावावर वनडेत ३५ तर कसोटीत २१ शतके आहेत.  यावरुनच विराटच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीचा अंदाज येतो. 

एबी डिव्हीलीअर्सला वनडेतील एक परिपूर्ण खेळाडू म्हणून संबोधले जाते. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू चांगले मित्र असून आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळतात.  

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment