---Advertisement---

टी20 विश्वचषक इतिहास: भारत किती वेळा चॅम्पियन? जाणून घ्या न्यूझीलंडच्या नावावर किती ट्रॉफी

On: रविवार, मार्च 8, 2026 5:54 PM
---Advertisement---

7 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेल्या टी-20 वर्ल्ड कपचा (ICC T20 international world cup 2026 Final) थरार आता एका महिन्यानंतर अंतिम टप्प्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील हा महामुकाबला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियावर विजेतेपदाचे मोठे दडपण असेल. विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याच्या संघासमोर मोठे आव्हान आहे, कारण टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताला अद्याप न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही.

2007 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे 10 वे वर्ष (2026) आहे. आतापर्यंत कोणत्या संघाने किती वेळा जेतेपद पटकावले आहे,

टी-20 वर्ल्ड कप विजेत्यांचा इतिहास (2007 – 2024)

2007 मध्ये भारताने फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला.
2009 मध्ये पाकिस्तानने फायनलमध्ये श्रीलंकेवर 8 विकेट्सनी मात केली.

2010 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सनी हरवून विजेतेपद मिळवले.

2012 साली वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा 36 धावांनी पराभव केला.
2014 – श्रीलंकाने भारताला 6 विकेट्सनी हरवून चॅम्पियन बनले.
2016 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडवर 4 विकेट्सनी विजय मिळवला.
2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी हरवून पहिली ट्रॉफी जिंकली.
2022 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला.
2024 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात करत ऐतिहासिक विजय मिळवला.

आतापर्यंत केवळ भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या तीनच देशांनी 2-2 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही संघाने सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकून आपले विजेतेपद राखलेले (Title Defend) नाही. 2024 च्या विजयानंतर भारताकडे सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकणारा जगातील पहिला संघ बनण्याची सुवर्णसंधी आहे. तर दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---