भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळ्या सामन्याचे आकर्षण ठरल्या. याही सामन्यात अनुभवी भारतीय फिरकीपटू आर अश्विनला ‘प्लेइंग ११’ मध्ये स्थान न देण्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्य झाले आहे. बऱ्याच तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंचा असा विश्वास होता की, अश्विन चौथ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनचा भाग राहित किंतु तसे घडले नाही. यावरुन इंग्लंडच्या माजी क्रिकेटरने भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
सध्याच्या मालिकेत खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजाला स्थान दिले जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही आर अश्विनला या मालिकेत आतापर्यंत सतत बाकावर बसावे लागले आहे.
माजी इंग्लिश सलामीवीर निक कॉम्पटनने या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वैयक्तिक समस्यांमुळे आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवले जात आहे. २०१२ मध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतात गेलेल्या इंग्लिश संघाचा भाग असलेल्या कॉम्पटनने असे ट्विट करत म्हटले आहे की, ‘कोहली आणि अश्विनचा वैयक्तिक मुद्दा त्यांच्या निवडीमध्ये अडथळा कसा बनू शकतो? हे कोणी सांगू शकेल का?’
Please can someone explain how Kohli obvious personal issues with Ashwin are allowed to cloud an obvious selection issue? #india
— Nick Compton (@thecompdog) September 2, 2021
आर अश्विन भारतीय संघात पदार्पण केल्यापासून क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपामध्ये भारताचा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. आतापर्यंत त्याने भारतीय संघात इतका वेळ बाकावर कधीच घालवलेला नाही. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये अश्विनला आतापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. अशा परिस्थितीत, वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विन भारताच्या फिरकी गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करताना दिसेल का? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर केएल राहुलला आयसीसीने ठोठावला दंड, जाणून घ्या कारण
ओव्हलमध्ये ६१ धावांची उपयुक्त खेळी करुनही पुजारा नाखुश; म्हणाला, ‘पुढच्या सामन्यात शतक ठोकणार’
जार्वोसारख्या मैदानात घुसणाऱ्या दर्शकाला जेव्हा क्रिकेटरने बॅटने दिला चोप, कसाबसा सुटला तावडीतून