फुटबॉल सामन्यांमध्ये खेळाडूंना दुखापती होणे साहजिक आहे. यात खेळाडूंच्या डोक्याला झालेली दुखापत बऱ्याचदा धोकादायक ठरल्याचे दिसून आले आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंच्या डोक्याची टक्कर झाल्यास त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. सोबतच हेडर घेतल्यानंतरही कन्कशनची समस्या उद्भवते. त्यामुळे क्रिकेटप्रमाणे फुटबॉल स्पर्धांमध्येही कन्कशन सब्सटिट्यूट नियम लागू करण्याची चर्चा चालू होती. आता ६ फेब्रुवारीपासून जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल लीगमध्ये हा नियम लागू होणार आहे.
फुटबॉलचे नियम बनवणारी संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्डने (IFAB) गतवर्षी डिसेंबरमध्ये हा नियम वापरण्याची परवानगी दिली होती. आता प्रसिद्ध फुटबॉल लीग अर्थात इंग्लंड प्रीमियर लीगमध्ये याचा वापर होताना दिसून येईल. सामन्यादरम्यान खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली किंवा संभावित लक्षणे असणाऱ्या खेळाडूंना कन्कशन सब्सटिट्यूट म्हणून वापरले जाऊ शकेल.
प्रत्येक संघाला मिळणार २ कन्कशन सब्सटिट्यूट
इंग्लंड प्रीमियर लीगच्या एस्टन विला आणि एवर्टन संघातील पहिल्या सामन्यापासून कन्कशन सब्सटिट्यूट नियम लागू होईल. याबरोबरच महिला सुपर लीग (Women’s Super League), एफए चषक (FA Cup) आणि चॅम्पियनशिप (Championship) या फुटबॉल स्पर्धांमध्येही या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कन्कशन सब्सटिट्यूट नियमानुसार, सामन्यांदरम्यान कोणत्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली किंवा संभावित लक्षणे दिसली. तर २ खेळाडूंना सब्सटिट्यूट (बदली) करण्याची मुभा असेल. महत्त्वाचे म्हणजे, साधारणपणे प्रत्येक फुटबॉल सामन्यात ३ सबटिट्यूट खेळाडू असतात. या खेळाडूंना आधीप्रमाणे वेगळे ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत एखाडा संघ ५ खेळाडूंना सब्सटिट्यूट करू शकतो.
मार्नस लॅब्यूशाने ठरला होता पहिला कन्कशन सब्सटिट्यूट
या नियमाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम उपयोग २०१९ मध्ये ऍशेस मालिकेदरम्यान करण्यात आला होता. दुसऱ्या ऍशेस कसोटीतील पहिल्या डावात जोफ्रा आर्चरचा चेंडू लागून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो उर्वरित सामन्यातून बाहेर पडला. त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्यूशानेची बदली खेळाडू म्हणून निवड केली. लॅब्यूशानेने या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
आयएसएल २०२०-२१ : नाट्यमय लढतीत गोवा-ईस्ट बंगाल बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : हैदराबादची अखेरच्या पाच मिनिटांत बेंगळुरूविरुद्ध बरोबरी