नवी दिल्ली। बीसीसीआयच्या चीनी कंपनी विव्होला त्याचा प्रायोजक म्हणून ठेवण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध आहे. सोमवारी (३ ऑगस्ट) अखिल भारतीय व्यापारी संघटनेने बीसीसीआयच्या या निर्णयाविरुद्ध गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.
व्यापारी संघटनेने आयपीएलवर लवकरात लवकर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारत सरकारने रविवारी (२ ऑगस्ट) आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरपासून होणार असून अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यूएईत होणार आहे.
व्यापाऱ्यांनी केली बीसीसीआयची तक्रार
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders (CAIT) चे महासचिव प्रवीण खंडेलवाल अमित शहा आणि एस जयशंकर यांना पत्र लिहिले, “बीसीसीआयच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल आपल्याला कळवायचे आहे. बीसीसीआयने चीनी कंपनी विव्होला दुबईमध्ये आयोजित होणाऱ्या आयपीएलचा प्रायोजक म्हणून कायम ठेवले आहे.”
त्यांनी पुढे लिहिले, “अशा काळात जेव्हा चीन भारतीय सीमांवर आमच्या देशांच्या भावनेशी खेळत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर भारताचे पालन करत आहे. अशामध्ये बीसीसीआयचा हा निर्णय सरकारच्या व्यापक धोरणाच्या विरोधात आहे.”
बीसीसीआयच्या विव्होला प्रायोजक म्हणून ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी स्वदेशी जागरण मंचानेही विरोध दर्शविला होता. संघाशी जोडलेल्या स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय सह-संयोजक अश्विनी महाराजने म्हटले, “आयपीएल एक व्यवसाय आहे आणि जे हे चालवत आहेत, त्यांना देशांच्या भावनेची काळजी नाही. संपूर्ण जग चीनवर बहिष्कार घालत आहे आणि आयपीएल त्या भावनांना दुखवत आहे. त्यांना समजले पाहिजे की देशापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही, अगदी क्रिकेटही नाही.”
बीसीसीआयला विव्होकडून मिळतात ४४० कोटी रुपये
बीसीसीआय आणि विव्होचा करार २०२२ पर्यंत आहे. जर बीसीसीआयने विव्होशी आपला करार तोडला, तर त्यांना खूप नुकसान होऊ शकते. नुकतेच बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी म्हटले होते की, आयपीएलसारख्या भारतीय स्पर्धांमध्ये चीनी कंपन्यांच्या प्रायोजनामुळे देशालाच फायदा होत आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, बीसीसीआयला विव्होकडून वर्षाला ४४० कोटी रुपये मिळतात. याबरोबरच ५ वर्षांचा करार २०२२ मध्ये संपणार आहे.
ताज्या वृत्तानुसार, विवो कंपनीने भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी त्यांच्या प्रायोजकतेच्या करारातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
-भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला धोनी म्हणतो, काय रे म्हाताऱ्या
-३७ चेंडूत खणखणीत शतक करताना आफ्रिदीने वापरली होती या भारतीय क्रिकेटरची बॅट
ट्रेंडिंग लेख-
-लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….