भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या काही काळापासून खराब फार्मशी झगडत आहे. आता आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सने पंड्याला संघात सामील केले नव्हते. आरसीबीविरुद्ध रविवारी (२६ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात तो बऱ्याच दिवसांनी खेळताना दिसला, पण संघासाठी काही खास करू शकला नाही.
त्यानंतर तो मंगळवारी (२८ सप्टेंबर) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चांगल्या फार्ममध्ये दिसला होता. त्याने या सामन्या ३० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. पण त्याने खेळलेल्या दोन्हपैकी एकाही सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. अशात त्याला टी २० विश्वचषकातून वगळले जाण्याची शक्यता आहे.
हार्दिकऐवजी या खेळाडूला मिळू शकते संधी
आगामी टी २० विश्वचषकासाठी हार्दिकला भारताच्या १५ सदस्यीय संघात सामील केले गेले आहे. मात्र, हार्दिकला या संघात अष्ठपैलूच्या भूमिकेत संधी दिली गेली आहे आणि यामुळेच त्याला फलंदाजीसोबतच गोलंदाजीसुद्धा करावी लागणार आहे. त्याने अजून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळलेल्या सामन्यात गोलंदाजी केलेली नाही, त्यामुळे त्याच्या फिटनेसवर अजूनही संशय घेतला जात आहे.
अशात सांगितले जात आहे की, जर पंड्याला फिटनेस मिळवता आली नाही, तर निवडकर्ते त्याच्या जागी अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरला संधी देऊ शकतात. शार्दुलला सध्या टी२० विश्वचषकात राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. शार्दुलने इंग्लंडमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगेल प्रदर्शन केले होते.
मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डच्या म्हणण्याप्रमाणे, हार्दिकला पूर्णपणे फिटनेस मिळवण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे. आणि त्यामुळेच त्याला यूएईमध्ये पहिल्या दोन सामन्यात बाहेर ठेवले गेले होते. आरसीबीविरुद्ध जेव्हा पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले तेव्हा निश्चित होते की, त्याला गोलंदाजी करण्याची आवश्यकता नाही.
१० ऑक्टोबरपूर्वी भारतीय संघात होऊ शकतो बदल
दरम्यान, आयसीसीच्या नियमांप्रमाणे बोर्ड त्यांच्या खेळाडूंमध्ये १० ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकत. जर हार्दिक पुढच्या काही सामन्यात चार षटकांचा स्पेल टाकू शकला नाही, तर त्याच्या संघातील स्थानावर निवडकर्त्यांना विचार करावा लागू शकतो. सध्या बीसीसीआयने त्याच्या फिटनेसवर नजर ठेवलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी आणि विलियम्सनच्या नेतृत्वात भिडणार चेन्नई-हैदराबाद, पाहा दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
तब्बल २० वर्षांनी मंधनाने ऑस्ट्रेलियात केला ‘तो’ कारनामा, ठरली जगातील दुसरीच महिला क्रिकेटर
‘या’ तिघांवर विश्वास न ठेवून संघांनी केली चूक; आज गाजवतायेत युएईची मैदाने