भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) शुक्रवारी (23 ऑगस्ट) काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या घरी पोहोचली. या भेटीचं चित्र समोर येताच विनेश लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता हरियाणामध्ये (1 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी आता भुपिंदर हुड्डा यांनीच विनेशच्या राजकारणातील प्रवेशावर मोठा खुलासा केला आहे.
एएनआयशी बोलताना भूपिंदर हुड्डा यांना विचारण्यात आलं की, विनेश काँग्रेसमध्ये जाणार आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, “हा काल्पनिक प्रश्न आहे. खेळाडू हे कोणा एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. पक्षात कोणी सामील झाले तर तुम्हाला कळवले जाईल. ज्याला पक्षात यायचे आहे. आम्ही त्याचे स्वागत करू, परंतु हा एक काल्पनिक प्रश्न आहे.”
भूपिंदर हुड्डा या मुलाखतीदरम्यान म्हणाले की, विनेश फोगटला (Vinesh Phogat) सुवर्णपदक विजेत्याला जसा सन्मान मिळतो तसाच सन्मान मिळायला हवा. ते म्हणाले, “मी यापूर्वीही म्हटलं आहे की, सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) राज्यसभेची जागा देऊन ज्याप्रमाणे सन्मानित करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे विनेशलाही उमेदवारी देण्यात यावी. तिच्यावर अन्याय झाला असून ती न्यायास पात्र आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
असे 3 खेळाडू, ज्यांच्यासाठी दुलीप ट्रॉफी ठरू शकते टर्निंग पॉइंट; टीम इंडियात मिळू शकते जागा
DPL 2024: सेंट्रल दिल्ली संघानं उडवला रिषभ पंतच्या संघाचा धुव्वा
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणाला मिळणार संधी रिषभ पंत की ध्रुव जुरेल?