भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चाहत्यांची निराशा करताना दिसला. वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर शुन्य धावा करून बाद झाला. परिणामी क्रिकेटजगतात सध्या सूर्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. अशात राजकीय वर्तुळातून देखील सूर्यकुमारवर टीका होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर थरूर याविषयी सोशल मीडियावर मत व्यक्त केले आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये फक्त तीन चेंडू खेळू शकला आणि एकही धाव करता आली नाही. शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या मते खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमारला संधी मिळत आहे. पण भारतासाठी गुणवंत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला मात्र संधी मिळत नाहीये. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ट्वीट केले की, “सूर्यकुमारने सलग तीन गोल्डन डकसह एक अविश्वरनीय विक्रम केला आहे. अशा हे विचारणे चुकीचे नसेल की, वनडे क्रिकेटमध्ये 66 च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला 6व्या क्रमांकावर फलंदाजीचा संधी मिळत नाहीये. सॅमसनने यासाठी अजून काय करणे अपेक्षित आहे?”
Now that poor @surya_14kumar has set an unenviable world record w/ his three golden ducks in a row, is it unreasonable to ask why @IamSanjuSamson, averaging averaging 66 in ODIs despite batting at an unfamiliar position for him at 6, wasn't in the squad? What does he need to do?
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 23, 2023
सॅमसन सध्या आयपीएलच्या तयारीत
थरूर यांनी या ट्वीटच्या माध्यमांतून थेट संघ व्यवस्थानप आणि बीसीसीआयच्या निवडकर्त्यांवर निशाना साधला आहे. थरूरव्यतिरिक्त इतर अनेक चाहते आणि जाणकारांनी सॅमसनला संधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सॅमसनने जानेवारी 2023 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही काळ दुखापतीवर काम करावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वनडे सामन्यात देखील सॅमसनला संधी न दिल्याने निवडकर्त्यांवर निशाणा साधला गेला. सध्या सॅमसन आयपीएल 2023 साठी तयारी करत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकाचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मात्र भारताला 10 विकेट्सने पराभव मिळाला. तिसऱ्या वनडे सामन्यात बुधवारी (22 मार्च) भारतीय संघ 21 धावांनी पराभूत झाला.
(Congress leader Shashi Tharun has expressed his displeasure over Suryakumar Yadav’s game and has supported Sanju Samson)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून ‘गब्बर’ बाहेर, निवृत्ती न घेताच सुरू केले नवीन काम? पाहा व्हिडिओ
भारताचा दारुण पराभव होताच दिग्गजाच्या विधानाने खळबळ; म्हणाला, ‘टीम इंडियाला रस्त्यासारख्या सपाट…’