---Advertisement---

ओव्हलमध्ये भारतीय संघासोबत बेईमानी? अंपायरने उघडपणे दिली इंग्लंडला साथ! चाहते संतापले! पहा VIDEO

On: गुरूवार, जुलै 31, 2025 9:07 PM
---Advertisement---

India vs England Oval Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर महत्त्वाचा कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रातच भारतीय संघाने आपले दोन्ही सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्या विकेट गमावल्या. साई सुदर्शन आणि शुबमन गिल संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यानंतर शुबमन गिलही धावबाद झाला.

इंग्लिश वेगवान गोलंदाज कहर करत आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो आगीसारखा पसरत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर भारतीय चाहते चांगलेच संतापले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, मैदानावरील अंपायर कुमार धर्मसेनाने भारतीय संघासोबत ‘बेईमानी’ केली आणि इंग्लंडचा एक डीआरएस वाचवला. (Kumar Dharmasena Controversy)

खरं तर, ही घटना भारतीय डावाच्या 13 व्या षटकात घडली. जोश टंगचा इनस्विंगर चेंडू थेट साई सुदर्शनच्या पायावर येऊन लागला. चेंडू इतका जबरदस्त होता की सुदर्शनचा पूर्णपणे तोल गेला आणि तो खाली पडला. टंगसह संपूर्ण इंग्लिश संघाने जोरदार अपील केली, पण अंपायरने सुदर्शनला नाबाद ठरवले. हा निर्णय देताना अंपायर कुमार धर्मसेनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Umpire decision controversy)

या फोटोमध्ये चाहत्यांनुसार, धर्मसेना इंग्लंडच्या खेळाडूंना असे सांगताना दिसत आहेत की, चेंडू सुदर्शनच्या पॅडला नाही, तर बॅटला लागला आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, धर्मसेनामुळे इंग्लिश संघाचा एक डीआरएस वाचला. म्हणजेच अंपायरने नकळतपणे का होईना, पण यजमान संघाला मदत केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---