आयपीएल 2023च्या 67व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅफिटल्स संघ आमने सामने होते. ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी या सामन्यात सीएसकेला वेगवान सुरुवात मिळवून दिली. आयपीएलमध्ये सीएसकेसाठी यापूर्वी एकापेफा एक सलामीवीर जोड्या खेळल्या आहेत. आता ऋतुराज आणि कॉनवे ही सलामीवीर जोडीही सीएसकेच्या सर्वोत्तम सलामीवीर जोड्यांपैकी एक बनली आहे. शनिवारी (20 मे) या दोघांनी मोठी भागीदारी केली आणि हंगामात 1000 धावाही पूर्ण केल्या.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023च्या प्लेऑफच्या शर्यातीत आहे. प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सीएसकेला विजय मिळवणे गरजेचे होते. याच पार्श्वभूमीवर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी सीएसकेला जोरदार सुरुवात मिळवून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांमध्ये 141 धावांची भागीदारी केली. या दोघांनी आयपीएल इतिहासात 1000 धावांची भागीदारीही पूर्ण केली. 1000 धावा करण्यासाठी ऋतुराज आणि गायकवाड या सलामीवीर जोडीला आयपीएलमध्ये 20 डावांमध्ये खेळाव्या लागल्या.
आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावांची भागीदारी पूर्ण करणारे सलामीवीर
जॉनी बेअरस्टो – डेविड वॉर्नर – 16 डाव
मयांक अगरवाल – केएल राहुल – 19 डाव
डेवॉन कॉनवे – ऋतुराज गायकवाड – 20 डाव
विराट कोहली – फाफ डू प्लेसिस – 21 डाव
डेविड वॉर्नर – शिखर धवन – 21 डाव
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, ऋतुराज गाकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्याकडे शतक करण्याची संधी होती. मात्र, दोघांनाही ही संधी साधता आली नाही. ऋतुराज गाकवाडने 50 चेंडूत 79 धावा केल्या आणि झेलबाद झाला. तर कॉनवेने 52 चेंडूत 87 धावा करून विकेट गमावली. सीएसकेने निर्धारित 20 षटकांमध्ये 223 धावा साकारल्या. या धावा सीएसकेने 3 विकेट्सच्या नुकसानावर केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शिवम दुबे 9 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. खलिल अहमद, एन्रीक नॉर्किया आणि चेतन साकरिया यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Conway-Gaikwad Scored 3rd Fastest to 1000 runs as an opening pair in the IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा रंगला धोनी-मॉरीसनमध्ये मजेदार कलगीतुरा, पाहा धोनीचा हजरजबाबीपणा
यावर्षी आयपीएलमध्ये फलंदाजांची दहशत! कॉनवेने मारला हंगामातील 1000वा षटकार