इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान बुधवारपासून (२ जून) सुरू झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने ३७८ धावा उभारल्या. पदार्पण करणाऱ्या डेवॉन कॉनवेने शानदार द्विशतक साजरे केले. त्याच्या कामगिरीनंतर चाहते त्याचे कौतुक करू लागले आहेत. इतकेच नव्हेतर, एका आयपीएल फ्रॅंचाईजीने त्याला आपल्या संघात सामील करून घेण्याचे संकेत देखील दिले.
कॉनवेचे विक्रमी द्विशतक
न्यूझीलंडसाठी आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या कॉनवेने सलामीला येत ३४५ चेंडूंमध्ये २२ चौकार व एका षटकाराच्या मदतीने २०० धावांची केली केली. यासह त्याचे नाव इतिहासात नोंदले गेले. पदार्पणात द्विशतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज बनला.
आयपीएलमध्ये या संघाचा बनू शकतो भाग
कॉनवेने द्विशतक पूर्ण करताच राजस्थान रॉयल्स या आयपीएल फ्रॅंचाईजीने त्याच्याबद्दल एक ट्विट केले. एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील छायाचित्र शेअर करत त्यांनी त्यावर ‘दॅट्स द वे कॉनवे’ लिहिले आहे.
What's the way to score a double hundred on Test debut?#ENGvNZ pic.twitter.com/EkQ41h085E
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 3, 2021
या ट्विटमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे की, कॉनवे राजस्थान रॉयल्स चे प्रतिनिधित्व करू शकतो. कारण ज्यावेळी आयपीएल २०२१ उर्वरित सामने सुरू असतील, त्या सामन्यांना कदाचित इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध राहणार नाहीत. राजस्थान रॉयल्स संघामध्ये सध्या जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर व लियाम लिव्हींगस्टोन हे इंग्लिश खेळाडू सामील आहेत. हे सर्व खेळाडू उपलब्ध नसल्यास त्यापैकी एकाचा बदली खेळाडू म्हणून कॉनवे राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसू शकतो.
जबरदस्त आहे कॉनवेची टी२० आकडेवारी
डेवॉन कॉनवेने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर १४ टी२० सामने खेळताना ५९.१२ च्या सरासरीने ४७३ धावा केल्या असून यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ९९ अशी आहे. त्याने आतापर्यंत एकूण ९४ टी२० खेळले असून यामध्ये ३०१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतकेदेखील लगावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर ‘असे’ होते सीएसके संघातील वातावरण, ऋतुराजने केला खुलासा
आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामात ‘अशी’ असेल सर्व फ्रँचायझींची प्लेइंग इलेव्हन
कसोटी पदार्पणात द्विशतक करत किवी सलामीवीराने मारलं मैदान, मग केला ‘हा’ नकोसा विक्रम