पर्थ । ॲशेस मालिकेत तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. संघात १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे तीन खेळाडू असूनही या इंग्लंडला या मालिकेत ३-० असे पराभूत व्हावे लागले.
खेळाडू म्हणून हा ऍलिस्टर कूकने ऑस्ट्रेलियामध्ये १४ पराभव पाहिले आहेत. एखाद्या खेळाडूने दुसऱ्या देशात पराभूत संघाचा भाग असण्याचा हा विक्रम आहे. कूक आता सचिन तेंडुलकर आणि महान क्रिकेटपटू जॅक हॉब्स यांच्याबरोबर संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत.
जॅक हॉब्स यांनी ऑस्ट्रेलियामध्ये २४ कसोटी सामने खेळले त्यात त्यांना १४ पराभवांना सामोरे जावे लागले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या देशात २० सामने खेळला असून त्यात १४ पराभव सचिननेही पाहिले आहेत तर कूक केवळ १८ सामन्यात १४वेळा संघ पराभूत होत असताना संघाचा भाग राहिला आहे.